Court Dainik Gomantak
देश

न्यायाधीशांच्या दिशेने भिरकावला बूट; सुनावणी सुरु असतानाच वकिल का संतापला?

Agar Malwa Court: आगर माळवा न्यायालयात काल एक धक्कादायक घटना घडली. एका वकिलाने न्यायालयाच्या प्रतिष्ठेचा भंग करत न्यायाधीशांच्या दिशेने बूट फेकला.

Manish Jadhav

Agar Malwa Court: आगर माळवा न्यायालयात काल एक धक्कादायक घटना घडली. एका वकिलाने न्यायालयाच्या प्रतिष्ठेचा भंग करत न्यायाधीशांच्या दिशेने बूट फेकला. दुपारी चार वाजता प्रथम आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रदीप दुबे यांच्या न्यायालयात जमीन फसवणूक प्रकरणाची सुनावणी सुरु असताना वकील नितीन अटल यांनी न्यायाधीशांसमोर युक्तिवाद केला. यादरम्यान अटल यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आणि न्यायाधीशांच्या दिशेने बूट फेकून गैरवर्तन केले. या संपूर्ण प्रकरणानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वकिलांच्या उपस्थितीत प्रथम आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रदीप दुबे हे नेहमीप्रमाणे सुनावणी घेत होते.

दरम्यान, नितीन अटल हे जमीन फसवणूक प्रकरणातील आरोपी आहेत. या प्रकरणांशी संबंधित खटल्याच्या सुनावणीसाठी ते आले होते. सुनावणीदरम्यान अटल आणि न्यायाधीश दुबे यांच्यात बाचाबाची झाली. यादरम्यान अटल यांनी न्यायाधीशांच्या दिशेने बूट फेकून गैरवर्तन केले. त्यानंतर न्यायालयात उपस्थित पोलिस कर्मचारी आणि कर्मचाऱ्यांनी अटलला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो पळून गेला. दुसरीकडे, माहिती मिळताच एएसपी, एसडीएम आणि एसडीओपी न्यायालयात पोहोचले. सायंकाळी 7 वाजेपर्यंत न्यायालयात गोंधळ सुरु होता. न्यायाधीशांची बैठकही झाली.

जमीन फसवणुकीत अटल यांचे नाव

दरम्यान, 2013 मध्ये कोतवाली येथे कोट्यवधींची सरकारी जमीन बळकावल्याप्रकरणी नितीन अटल आणि त्यांच्या कुटुंबाविरुद्ध फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल करण्यात आले होते. ही सर्व प्रकरणे सध्या न्यायालयात प्रलंबित आहेत. खटल्याची सुनावणी पुढे ढकलण्याचे रोजच प्रयत्न केले जात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Sex Racket Bust: वास्को पोलिसांची दाबोळीतील 'स्पा'वर छापेमारी, सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करत सहा महिलांची सुटका; दोघे अटकेत

Krishnaji Kank: फोंडा किल्ल्यासाठी शंभूराजे दौडत आले, गोव्याचा गव्हर्नर पोर्तुगीज सैन्यासह पळत सुटला; शूरवीर कृष्णाजी कंकांची कथा

Terrorists Attack in India: हाफिज सईदकडून भारतावर हल्ल्याचा कट, बांगलादेशला 'लाँचपॅड' बनवण्याची तयारी; दहशतवादी सैफुल्लाहचा चिथावणीखोर VIDE0 व्हायरल

Ironman 70.3 Goa India: गोवा 'आयर्नमॅन' स्पर्धेत विदेशी खेळाडूंनी मारली बाजी! भारतीय एअर फोर्सनेही नोंदवला तिहेरी विजय

Pooja Naik: “संबंधितांची नावे उघड करावी, कोणाचीही गय करणार नाही”, पूजा नाईक प्रकरणी मुख्यमंत्र्यांची कठोर भूमिका

SCROLL FOR NEXT