Latest Survey on Assembly Elections 2022: देशातील पाच राज्यांमध्ये नुकत्याच विधानसभा निवडणुकांच्या (Assembly Election) तारखा जाहीर झाल्या आहेत. 14 जानेवारीला मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर या निवडणुकांच्या प्रकियेला सुरुवात होणार असून 10 मार्च रोजी कोणत्या राज्यात कोणाचे सरकार येणार हे कळणार आहे. पण त्यापूर्वी एबीपी न्यूज-सी-व्होटरने एक ओपिनियन पोल केला असून, त्यामध्ये लोकांची मते जाणून घेण्यात आली. 5 राज्यांच्या या सर्वात मोठ्या सर्वेक्षणात सर्व 690 विधानसभा जागांसाठी तब्बल 89 लोकांची मते घेण्यात आली आहेत. 12 डिसेंबर ते 8 जानेवारी दरम्यान हे सर्वेक्षण करण्यात आले.
गोवा विधानसभा निवडणूक (Goa Assembly Election 2022)
या सर्वेक्षणानुसार गोवा राज्यात भाजपला (BJP) 32 टक्के मते मिळू शकतात. तर काँग्रेसला 20 टक्के आणि आम आदमी पार्टीला 22 टक्के मते मिळू शकतात. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष (MGP) (एमजीपी) आघाडीला 8 टक्के आणि इतरांना 18 टक्के मते मिळू शकतात. दुसरीकडे जागांचे बोलायचे झाले तर 40 जागांच्या विधानसभेत भाजपला 19-23 जागा मिळू शकतात. काँग्रेसला (Congress) 4-8 जागांवर समाधान मानावे लागेल. सागरी राज्यात तृणमूलला (TMC) 5-9 जागा मिळू शकतात. MGP आघाडीला 2-6 जागा मिळू शकतात. तर इतरांना 0-4 जागा मिळू शकतात.
उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूक (Uttar Pradesh Assembly Election 2022)
सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार, उत्तरप्रदेशमध्ये सत्ताधारी भाजप आणि समाजवादी पक्ष यांच्यात थेट लढत आहे. सध्या जनता पुन्हा भाजपच्या हाती सत्ता सोपवण्याच्या मनस्थितीत असल्याचे ताज्या आकडेवारीवरून दिसून येते. देशातील या मोठ्या राज्यात भाजप पुन्हा एकदा सरकार स्थापन करेल, असा विश्वास 49 टक्के लोकांनी या सर्वेक्षणात व्यक्त केला आहे. त्याचबरोबर या निवडणुकीत अखिलेश यादव यांच्या सपाला सत्तेची चावी मिळेल, असे 30 टक्के लोकांना वाटते. यंदाच्या निवडणुकीत बसपा सरकार स्थापन करेल असे 7 टक्के लोकांना वाटते. त्याचवेळी राज्यात काँग्रेसची सत्ता येईल, असे 7 टक्के लोकांना वाटते. सत्ता इतरांच्या खात्यात जाईल, असे 40 टक्के लोकांना वाटते, तर एक टक्का लोकांनी त्रिशंकू विधानसभा होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
पंजाब विधानसभा निवडणूक (Punjab Assembly Election 2022)
निवडणूक असलेल्या आणखी एका महत्वाच्या राज्यात म्हणजे पंजाबमध्ये सर्व राजकीय पक्षांकडून उमेदवारांची घोषणा केली जात आहे. यावेळी एकीकडे काँग्रेसने जुन्या मुख्यमंत्र्यांचा चेहरा बदलून चरणजितसिंग चन्नी यांना मुख्यमंत्री बनवून सत्ताविरोधी लाट कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. तर आम आदमी पक्ष जोरदार मुसंडी मारण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पक्षाने भाजपसोबत युती केली आहे. अशा स्थितीत राज्यातील जनता कोणाला संधी देणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. एबीपी न्यूज सी व्होटर सर्व्हेनुसार, 6 टक्के लोक कॅप्टन अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्री म्हणून पसंत करत आहेत. राज्यातील जनतेला सुखबीर सिंग बादल 15 टक्के, अरविंद केजरीवाल (AAP) 17 टक्के, चरणजीत सिंग चन्नी 29 टक्के, नवज्योत सिंग सिद्धू 6 टक्के, भगवंत मान 23 टक्के आणि 4 टक्के लोकांना इतर मुख्यमंत्री पाहायचे आहेत.
उत्तराखंड विधानसभा निवडणूक (Uttarakhand Assembly Election 2022)
एबीपी न्यूज-सी व्होटरच्या सर्वेक्षणानुसार, उत्तराखंडमध्ये आम आदमी पक्षाचे उडी घेतली असली तरी इथे काँग्रेस आणि भाजपमध्येच थेट लढत आहे. उत्तराखंडमध्ये भाजप जास्त जागांवर आघाडीवर असला तरी मुख्यमंत्रीपदासाठी मात्र हरीश रावत यांची पहिली पसंती कायम आहे. 37 टक्के लोकांना हरीश रावत यांना मुख्यमंत्री म्हणून पाहायचे आहे, तर पुष्कर सिंग धामी 29 टक्के, अनिल बलुनी 18 टक्के, कर्नल कोथियाल 9 टक्के आणि 7 टक्के लोकांना इतर मुख्यमंत्री पाहायचे आहे. सर्व्हेनुसार उत्तराखंडमधील 70 विधानसभा जागांपैकी भाजप 31 ते 37 जागांवर राहू शकतो. तर काँग्रेसला 30 ते 36, आम आदमी पार्टीला 2 ते 4 आणि इतरांच्या खात्यात 0 ते 1 जागा मिळू शकते.
मणिपूर विधानसभा निवडणूक (Manipur Assembly Election 2022)
ओपिनियन पोलनुसार मणिपूरमध्ये चुरशीची स्पर्धा होणार आहे. भाजप 23 ते 27 जागा जिंकू शकतो, तर काँग्रेसला 22 ते 26 जागा मिळू शकतात. तर एनपीएफमध्ये 2 ते 6 जागा आणि इतरांच्या खात्यात 5 ते 9 जागा येऊ शकतात.
कोणत्या राज्यात मतदान कधी होणार?
यूपीमध्ये विधानसभेच्या निवडणुका 7 टप्प्यात होणार आहेत, तर मणिपूर, गोवा, उत्तराखंड आणि पंजाबमध्ये दोन टप्प्यात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. यूपीमध्ये पहिला टप्पा 10 फेब्रुवारी, दुसरा टप्पा 14 फेब्रुवारी, तिसरा टप्पा 20 फेब्रुवारी, चौथा टप्पा 23 फेब्रुवारी, पाचवा टप्पा 27 फेब्रुवारी, सहावा टप्पा 3 मार्च, सातवा टप्पा. 7 मार्च रोजी. याशिवाय 14 फेब्रुवारीला यूपी तसेच पंजाब, गोवा आणि उत्तराखंडमध्ये मतदान होणार आहे. या तीन राज्यांमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. मणिपूरमध्ये 27 फेब्रुवारी आणि 3 मार्चला दोन टप्प्यात मतदान होणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.