General Bipin Rawat Twitter/ @ANI
देश

अश्रू नयनांनी बिपीन रावत यांना सर्व पक्षीय नेत्यांचा अखेरचा निरोप !

भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत (General Bipin Rawat) यांच्यावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत.

दैनिक गोमन्तक

भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत (General Bipin Rawat) यांच्यावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी एक दिवस आधी पालम एअरबेसवर CDS, त्यांची पत्नी आणि 11 जवानांना श्रद्धांजली वाहिली होती. या आठवड्यात तामिळनाडूच्या निलगिरी जिल्ह्यातील कुन्नूर येथे लष्कराच्या हेलिकॉप्टर अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये सीडीएसशिवाय त्यांची पत्नी आणि 11 जवानांचा समावेश आहे. या दुर्घटनेतील एकमेव बचावलेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांच्यावर लष्कराच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांनी सीडीएस जनरल बिपिन रावत यांना श्रद्धांजली वाहिली. सीडीएस बिपिन रावत आणि मधुलिका रावत (Madhulika Rawat) यांच्या मुली कृतिका आणि तारिणी यांनीही त्यांच्या माता पित्यांना श्रद्धांजली वाहिली. त्याचबरोबर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सीडीएस बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांना श्रद्धांजली वाहिली. शिवाय, सीडीएस बिपिन रावत यांना श्रद्धांजली वाहताना एक वृद्ध महिला ढसाढसा रडली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सीडीएस बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीला श्रद्धांजली वाहत आपल्या संवेदना प्रकट केल्या. ब्रिगेडियर एलएस लिडर यांना दिल्ली कॅंटमधील बेरार स्क्वेअर येथे अखेरचा निरोप देण्यात आला. तामिळनाडूतील हेलिकॉप्टर अपघातात लिडर यांना आपला जीव गमवावा लागला.

तसेच, सीडीएस जनरल बिपिन रावत आणि मधुलिका रावत, ब्रिगेडियर एलएस लिडर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग, विंग कमांडर पीएस चौहान, स्क्वाड्रन लीडर के सिंग, जेडब्ल्यूओ दास, जेडब्ल्यूओ प्रदीप ए, हवालदार सतपाल, नाईक गुरसेवक सिंग, नाईक जितेंद्र कुमार, लान्स नाईक विवेक कुमार आणि नाईक लान्स नाईक साई तेजाला प्राण गमवावे लागले. जनरल विपिन रावत यांचे पार्थिव प्रथम पालम विमानतळावर आणण्यात आले. यावेळी तिन्ही सैन्यदलांचे प्रमुखही उपस्थित होते. यावेळी सर्व शूर सुपुत्रांचे नातेवाईक तेथे उपस्थित होते. मृतदेह येताच कुटुंबीयांना धक्का बसला. श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीडीएसच्या कुटुंबीयांचीही भेट घेतली.

शिवाय, जनरल विपिन रावत यांच्यासह अपघातात प्राण गमावलेल्या सुपुत्रांना केरळपासून काश्मीरपर्यंत श्रद्धांजली वाहण्यात आली. त्याचवेळी सीडीएसचे पार्थिव कुन्नूरला आणले जात असताना लोकांनी पुष्पवृष्टी करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली. इतकंच नाही तर काश्मीरच्या लाल चौकातही लोकांनी पाणावलेल्या डोळ्यांनी वीरपुत्रांचे स्मरण केले. त्याचबरोबर सुरतमध्ये मुलांनीही श्रद्धांजली वाहिली. गुरुवारी तमिळनाडूतील कुन्नूर येथे झालेल्या अपघातात प्राण गमावलेल्या सर्व 13 मृतांचे पार्थिव विमानाने दिल्लीच्या पालम विमानतळावर नेण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि NSA अजित डोवाल यांनी विमानतळावर पोहोचून शूर पुत्रांना श्रद्धांजली वाहिली. शुक्रवारी सकाळी 11 ते 12.30 या वेळेत सर्वसामान्य नागरिकांना रावत दाम्पत्याला श्रद्धांजली वाहता येणार आहे. यानंतर दुपारी 12.30 ते 1.30 पर्यंत लष्करी अधिकारी श्रद्धांजली वाहण्यासाठी येतील. त्यानंतर दुपारी 2 वाजता त्यांचे पार्थिव दिल्ली कँट ब्रार चौकात अंत्यसंस्कारासाठी नेण्यात येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Beef Shortage: गोव्यातील गोमांस पुरवठा साखळीला ब्रेक, गोरक्षकांच्या कथित हल्ल्यांविरोधात महाराष्ट्र कर्नाटकात संप!

GST 2.0: जीएसटीच्या नव्या दरांची लवकरच घोषणा! सिगारेटवर द्यावा लागणार 40 टक्के कर; केंद्र सरकारचा नवा प्रस्ताव

Honour Killing: डॉक्टर बहिणीची लहान भावानेच केली गोळ्या झाडून हत्या; थरकाप उडवणाऱ्या घटनेबाबत धक्कादायक खुलासा

Krishna Janmashtami 2025 Wishes In Marathi: 'कृष्ण' जन्मला ग बाई... जन्माष्टमीनिमित्त मित्रपरिवाराला पाठवा 'या' गोड, नटखट शुभेच्छा

Krishna Janmashtami 2025: कृष्ण जन्माष्टमीचा शुभ योग; 'या' 3 राशींवर राहिल श्रीकृष्णाची कृपा, परदेश प्रवासाचीही सुवर्णसंधी

SCROLL FOR NEXT