Jammu and Kashmir Dainik Gomantak
देश

Jammu and Kashmir: कुलगाममध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत लष्करचा टॉप कमांडर ठार; तीन दहशतवादीही ढेर

Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले आहेत.

Manish Jadhav

Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले आहेत. यामध्ये लष्करचा टॉप कमांडर बासित दारचाही समावेश आहे. नुकताच पुंछमध्ये हवाई दलाच्या तुकडीवर दहशतवादी हल्ला झाला होता, ज्यात एक जवान शहीद तर 4 जण जखमी झाले होते.

कुलगामच्या रेदवानी पायीन भागात सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरु केली होती. येथे मोठ्या संख्येने दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. यानंतर संपूर्ण परिसराला वेढा घालून कारवाई सुरु करण्यात आली. दरम्यान, समोर आलेल्या व्हिडिओमध्ये असे दिसून येते आहे की, दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला होता. यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला.

गेल्या वर्षीच राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) लष्करची सहयोगी संघटना द रेझिस्टन्स फ्रंट (TRF) चा कमांडर बासित अहमद दारवर 10 लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बासित हा अनेक हल्ल्यांचा मास्टरमाईंड होता. बासित हा कुलगामचा राहिवासी होता, जो गेल्या वर्षी एप्रिल 2022 पासून बेपत्ता होता. तो लश्कर-ए-तैयबाच्या द रेझिस्टन्स फ्रंट (TRF) मध्ये सामील झाला होता.

4 मे रोजी दहशतवादी हल्ला झाला होता

दरम्यान, 4 मे रोजी जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पुंछ जिल्ह्यात दहशतवाद्यांनी भारतीय हवाई दलाच्या ताफ्यावर हल्ला केला होता. सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात भारतीय वायुसेनेचा 1 जवान शहीद, तर 4 जण जखमी झाले होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, शनिवारी संध्याकाळी हवाई दलाचा ताफा जिल्ह्यातील सुरनकोट भागातील सनई टॉपकडे जात असताना हा हल्ला झाला. या हल्ल्यात सामील असलेल्या दहशतवाद्यांना शोधून त्यांचा खात्मा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरु करण्यात आली आहे.

वर्षभरात दुसऱ्यांदा हल्ला झाला

जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात या वर्षात सुरक्षा दलांवर झालेला हा दुसरा मोठा हल्ला आहे. जानेवारीमध्ये संशयित दहशतवाद्यांनी (Terrorists) सुरक्षा दलांच्या ताफ्यावर जोरदार गोळीबार केला होता. भारतीय हवाई दलाच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात दहशतवाद्यांच्या याच गटाचा हात असल्याचा संशय सुरक्षा अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. ज्यांनी गेल्या वर्षी 21 डिसेंबर रोजी बुफलियाज भागात सुरक्षा दलांच्या वाहनांवर हल्ला केला होता, ज्यामध्ये चार सैनिक ठार झाले होते आणि तीन जखमी झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दणका! वेर्णात वृक्षतोडीला स्थगिती, उच्च न्यायालयाचा निर्णय; तज्ज्ञ समितीकडून पाहणी

Karapur Mega Project Protest: आंदोलकांना पणजीत रोखले; गुन्हे न नोंदविताच सोडले, मेगा प्रकल्पाविरोधात कारापूरवासी एकवटले

Monsoon Update: पावसाचा दिलासा 22 जूननंतरच; राज्य हवामान विभागाचा अंदाज; आता पाणी जपूनच वापरा! धरणांतील पाणी आटल्‍यानं जलस्रोत खात्‍याला चिंता

Horoscope: शुक्रवारचा दिवस ठरणार लाभदायक! 4 राशींना मिळणार यशाची नवी दिशा; कुटुंब, करिअर आणि आर्थिक क्षेत्रात सकारात्मक बदलांचे संकेत

Goa Drugs Case: काणकोणमध्ये अंमली पदार्थांवर कारवाई; 26.9 ग्रॅम चरससह हॉटेलच्या वेटरला अटक

SCROLL FOR NEXT