Flat owner denies home for  Dainik Gomantak
देश

याला काय अर्थ आहे? 12 वीमध्ये कमी गुण असल्याने घरमालकाने भाडेकरूला नाकारले घर

12 वीचे गुण तुमचे भविष्य ठरवू शकत नाहीत; पण मेट्रो सिटीत तुम्हाला भाड्याने घर मिळेल की नाही ते ठरवू शकतात!

Akshay Nirmale

Landlord denies home to tenant for low marks in 12th std: काम आणि शिक्षणाच्या निमित्ताने अनेक लोकांना गाव, शहर सोडून बाहेरील शहरांमध्ये जाऊन राहावे लागते. नव्या शहरात भाड्याने घर शोधणे, चांगले घर मिळणे हे कसरतीचे काम असते. अनेक घरमालकदेखील लहरी आणि विचित्र असतात. नुकतेच एका घरमालकाने भाडेकरूला चक्क 12 वी मध्ये गुण कमी असल्याच्या कारणावरून घर नाकारले आहे.

भारताचे आयटी हब आणि स्टार्टअपसाठी ओळखल्या जाणाऱ्या बंगळूरू या महानगरात हा प्रकार घडला आहे. बंगळूरू हे शहर घरभाड्याच्या किंमतीही जास्त आहेत आणि घरमालकांच्या अवास्तव मागण्यांसाठीही बंगळूर कुप्रसिद्ध आहे. बंगळूरूमध्ये घर भाड्याने शोधण्यापेक्षा आयआयटीमध्ये प्रवेश करणे सोपे आहे, असे म्हटले जाते.

एका ट्विटर युजरने त्याच्या चुलत भावाबाबत घडलेला हा प्रकार सोशल मीडियात शेअर केला आहे. त्याने ब्रोकर सोबत झालेले व्हाट्सअॅप संभाषणाचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. त्यातून केवळ १२ वीमध्ये गुण कमी असल्यावरून त्याला घर नाकारल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

ट्विटर वापरकर्ता शुभ (@kadaipaneeeer) याने म्हटले आहे की, त्याच्या चुलत भावाला 12 वी तील गुणांमुळे भावी घरमालकाने घर नाकारले. हे कारण अविश्वसनीय वाटत असले तरी ते खरे आहे.

एका ब्रोकरने त्याचा चुलत भाऊ योगेशला त्याचे LinkedIn, Twitter प्रोफाइल, तो ज्या कंपनीत नोकरीला होता त्याचे जॉइनिंग लेटर आणि त्याची इयत्ता 10 वी आणि 12 वीची मार्कशीट, आधार आणि पॅन कार्ड शेअर करण्यास सांगितले. त्याला स्वत:बद्दल 200 शब्दांत लेख लिहायलाही सांगितले होते.

त्यानंतर ब्रोकरने त्याला कळवले की घरमालकाने संबंधित भाडेकरूला बारावीतील गुणांच्या कारणावरून नाकारले आहे. 12 वी मध्ये 90 टक्के गुण असायला हवेत, अशी घरमालकाची अपेक्षा होती आणि भाडेकरूला मात्र 75 टक्के गुण मिळाले आहेत.

त्यावर या ट्विटमध्ये त्याने, गुण तुमचे भविष्य ठरवत नाहीत, पण तुम्हाला बंगळूरूमध्ये फ्लॅट मिळेल की नाही हे निश्चितपणे ठरवतात, अशई कॅप्शन दिली आहे. हा घरमालक आयआयएममधून निवृत्त झाल्याचेही त्याने म्हटले आहे.

मजेशीर कॉमेंट्स, व्यंगचित्रांतून नेटकऱ्यांनी घेतली मजा...

दरम्यान, या ट्विटवर नेटकऱ्यांनी मजेशीर कॉमेंट्स केल्या आहेत. एकाने म्हटले आहे की, हे एक दुःखद वास्तव आहे. पण जेव्हा माझ्या घरमालकिणीला माझ्या कामाविषयी माहिती मिळाली तेव्हा तिने मला कॉफीसाठी बोलावले.

आणखी एका युजरने म्हटले आहे की, भावा हे खरं आहे. आणि जर तुम्ही तुमच्या मोलकरणीला सांगितले की तुम्ही एखाद्या आयटी कंपनीत काम करता, तर ती तुमच्याकडे घरकामासाठी दरमहा 30 हजार रूपये पगार मागेल आणि जर तुम्ही आयटीमध्ये काम करत नाही हे तिला पटवून दिलात तर ती 9 हजार पगार घेईल.

आणखी एकाने म्हटले आहे की, “लवकरच आमची बंगळुरू फ्लॅट्ससाठी प्रवेश परीक्षा होणार आहे !!!”

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT