Lalu Prasad Yadav Dainik Gomantak
देश

Lalu Prasad Yadav उपचारासाठी सिंगापूरला जाणार, पासपोर्ट जारी करण्याचे कोर्टाचे आदेश

RJD: राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव उपचारासाठी सिंगापूरला जाऊ शकणार आहेत.

दैनिक गोमन्तक

Lalu Prasad Yadav: राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव उपचारासाठी सिंगापूरला जाऊ शकणार आहेत. त्यांच्या अर्जावर शुक्रवारी सीबीआय न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान त्यांच्या वकिलाने सिंगापूरला उपचारासाठी घेऊन जाण्यासाठी पासपोर्ट जारी करण्याची विनंती केली. तसेच निघण्याच्या तारखेपासून किमान 2 महिन्यांचा कालावधी द्यावा, असेही त्यांनी सांगितले. तेथून परतल्यानंतर पासपोर्ट पुन्हा न्यायालयात सादर केला जाईल.

दरम्यान, सुनावणीनंतर न्यायालयाने पासपोर्ट जारी करण्याचे आदेश दिले. तेथील डॉक्टरांनी 24 सप्टेंबर ही भेटीची तारीख दिली आहे. अटीनुसार त्यांचा पासपोर्ट सीबीआय (CBI) कोर्टात जमा आहे. 13 सप्टेंबर रोजी त्यांचे वकील प्रभात कुमार यांनी विशेष सीबीआय न्यायाधीश दिनेश राय यांच्या न्यायालयात (Court) पासपोर्ट जारी करण्यासाठी अर्ज दाखल केला होता.

तसेच, लालूप्रसाद यांनी 31 ऑगस्ट रोजी सीबीआय न्यायालयात नूतनीकरणानंतर पासपोर्ट जमा केला होता. त्यांच्या पासपोर्टचे (Passport) 12 ऑगस्ट 2022 रोजी नूतनीकरण करण्यात आले. पासपोर्टची वैधता 11 ऑगस्ट 2023 पर्यंत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT