Arrested Dainik Gomantak
देश

Indian Army: "माझे अपहरण झाले आहे, पैसे घेऊन या…"; लष्करी जवानाच्या कॉलनं खळबळ

West Bengal: कोलकाता येथे भारतीय लष्कराच्या जवानाचे अपहरण झाल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली.

Manish Jadhav

West Bengal: कोलकाता येथे भारतीय लष्कराच्या जवानाचे अपहरण झाल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली. भारतीय लष्कराच्या जवानाने नशेच्या अवस्थेत घरी फोन करुन आपले अपहरण झाल्याची धक्कादाक माहिती दिली. त्यामुळे आणखी गोंधळ निर्माण झाला. ही माहिती मिळताच लालबाजार पोलीस तात्काळ त्याला वाचवण्यासाठी पोहोचले. हा संपूर्ण प्रकार समजल्यानंतर पोलिसांनाही मोठा धक्का बसला. असे कसे होऊ शकते असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कराच्या जवानाला पैशांची खूप गरज होती. पैशासाठी अपहरण झाल्याची कहाणी या जवानाने रचली. आपले अपहरण झाल्याचा दावा करत या जवानाने फोन करुन कुटुंबाकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्या कुटुंबीयांनी तात्काळ पोलिसांना याबाबत कळवले. याची माहिती मिळताच कोलकाता पोलीसांनी तपास सुरु केला आणि त्याची सुटका केली. त्यानंतर आता आरोपीला लष्कराच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

लष्कराच्या जवानाने फोन केला

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुण गुलेरिया असे आरोपी आर्मी कर्मचाऱ्याचे नाव आहे. अरुणाचल प्रदेशच्या 20 शीख रेजिमेंटमध्ये ते लष्करी कर्मचारी आहेत. ते तिथे स्वयंपाकी म्हणून काम करतात.12 ऑगस्ट रोजी अरुण गुलेरिया शारीरिक तपासणीसाठी कोलकाता येथील कमांड हॉस्पिटलमध्ये आले होते. त्यानंतर ते तेथून निघून गेले. अलीपूर कमांड हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी थेट न्यू मार्केटमध्ये गाठले. तिथे ते हॉटेलमध्ये रुम बुक करुन थांबले. तिथे बसूनच त्यांनी अपहरणाची कहाणी रचली. त्यांनी कुटुंबीयांना फोन केला आणि घाबरलेल्या अवस्थेत नातेवाईकांना अपहरण झाल्याची कहाणी ऐकवली.

मोबाईल लोकेशन ट्रॅक करुन पोलीस पोहोचले, त्यानंतर...

दरम्यान, ही बातमी मिळताच लालबाजार पोलीस मुख्यालयाने तात्काळ तपास सुरु केला. त्यांनी लष्कराच्या जवानाचे मोबाईल लोकेशन ट्रॅक करण्यास सुरुवात केली. मोबाईल लोकेशन ट्रॅक करुन हॉटेलमध्ये पोहोचल्यावर पोलीस अधिकाऱ्यांना रजिस्ट्रारमध्ये नाव दिसले. लालबाजार पोलिस ठाण्यात रविवारी अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली होती. दुसरीकडे, पोलिसांनी न्यू मार्केटमधील हॉटेलमधून लष्कराच्या जवानांची सुटका केली. लालबाजारच्या सूत्रांनी दिलेल्या

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT