Massive fire at hotel on Mirza Ghalib Street in Kolkata Dainik Gomantak
देश

Kolkata Hotel Fire: "उपचारासाठी भारतात आले अन् काळाने गाठले!" कोलकात्यात हॉटेलला भीषण आग, 9 बांगलादेशींचा मृत्यू; अनेकजण जखमी VIDEO

Kolkata Hotel Fire Mirza Galib Street: कोलकात्यातील मध्यवर्ती भागात असलेल्या मिर्झा गालिब स्ट्रीटवरील एका हॉटेलमध्ये बुधवारी (19 ऑगस्ट) पहाटेच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली.

Manish Jadhav

Kolkata Hotel Fire Mirza Galib Street: कोलकात्यातील मध्यवर्ती भागात असलेल्या मिर्झा गालिब स्ट्रीटवरील एका हॉटेलमध्ये बुधवारी (19 ऑगस्ट) पहाटेच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली. या आगीत एका बालकासह 9 जणांचा होरपळून मृत्यू झाला. हे सर्व मृत नागरिक बांगलादेशचे रहिवासी असून ते उपचारासाठी आणि पर्यटनासाठी भारतात आले होते. या दुर्घटनेत अनेक लोक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पहाटे सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास जेव्हा हॉटेलमधील सर्व नागरिक गाढ झोपेत होते, तेव्हा अचानक आगीचा भडका उडाला. काही वेळातच संपूर्ण हॉटेलमध्ये धुराचे प्रचंड साम्राज्य पसरले. यामुळे परिसरात गोंधळाचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. झोपेत असलेल्या नागरिकांना काही समजण्यापूर्वीच आगीने रौद्ररुप धारण केले. काही पर्यटकांनी कसेबसे बाहेर पडून स्वतःचा जीव वाचवला, परंतु अनेक जण धूर आणि आगीच्या ज्वाळांमध्ये अडकून पडले.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 4 गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनंतर आगीवर (Fire) नियंत्रण मिळवले आणि आत अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासकीय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत आणि बचावकार्याची पाहणी केली.

प्राथमिक तपासात आगीचे कारण शॉट सर्किट असल्याचे मानले जात आहे, मात्र अधिकृत सूत्रांकडून याला अद्याप दुजोरा मिळालेला नाही. हॉटेलमधील अग्निरोधक यंत्रणा, आणीबाणीच्या वेळी बाहेर पडण्याचे मार्ग आणि अलार्म योग्य प्रकारे कार्यरत होते की नाही, याची पोलीस प्रशासनाकडून कसून चौकशी केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT