Keralam School Shooting ai generated images
देश

Keralam School Shooting: मित्रांना बंदूक दाखवण्याचा नाद बेतला जीवावर! अचानक सुटलेल्या गोळीत नववीतील विद्यार्थी जखमी; केरळमधील थरकाप उडवणारा प्रकार

Keralam Palakkad School Shooting Class 9 Student: केरळमधील पलक्कड जिल्ह्यातील एका शाळेत गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली.

Manish Jadhav

Keralam Palakkad School Shooting Class 9 Student: केरळमधील पलक्कड जिल्ह्यातील एका शाळेत गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली. थ्रिथला येथील परुथुर हायर सेकंडरी स्कूलमध्ये नववीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला गोळी लागली. त्याच्याच वर्गातील दुसऱ्या एका विद्यार्थ्याकडून ही गोळी चुकून सुटल्याची प्राथमिक माहिती समोर आली. या घटनेमुळे शाळेच्या परिसरात मोठी खळबळ उडाली आणि विद्यार्थ्यांमध्ये घबराट पसरली. जखमी झालेल्या विद्यार्थ्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नववीच्या एका विद्यार्थ्याने आपल्या घरातून लपवून ही बंदूक शाळेत (School) आणली होती. वर्गातील इतर मित्रांना हे शस्त्र दाखवण्याचा त्याचा हेतू होता. मुले वर्गात ती बंदूक पाहत आणि हाताळत असतानाच अचानक त्यातून गोळी सुटली आणि ती जवळच उभ्या असलेल्या एका विद्यार्थ्यांच्या हाताला लागली. प्राथमिक तपासात हा प्रकार अपघाताने घडल्याचे दिसत असले, तरी शाळेत बंदूक कशी आली आणि कोणाचा निष्काळजीपणा आहे, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.

शालेय परिसरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला. यापूर्वी हरियाणामधील पंचकूला येथील एका सरकारी शाळेतही अशीच संतापजनक घटना घडली होती. तिथे तिसरीत शिकणाऱ्या एका मुलाने केजीच्या लहान मुलीवर लाथांनी आणि दगड-कुंडीने हल्ला केला होता. त्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्या गंभीर प्रकरणात दोन शिक्षकांना निलंबित करण्यात आले होते, तर मुख्याध्यापक, वर्गशिक्षक आणि चौकीदाराविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. लहान मुलांमध्ये वाढणारी हिंसक प्रवृत्ती आणि शाळांमधील सुरक्षेतील त्रुटी यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'16 डिसेंबरपर्यंत भारत बांगलादेश ताब्यात घेईल'; पश्चिम बंगालच्या मंत्र्यांचा मोठा दावा, हिंदूंच्या हत्यांचा बदला घेण्याचा इशारा

T20 Cricket: हातातला विजय गोव्याने गमावला! अखेरच्या षटकात फेलिक्सची गोलंदाजी महागात, छत्तीसगडचा विजय

Delhi Crime: ज्या सहकाऱ्यांसोबत पार्टी केली, तेच बनले सैतान! दिल्लीतील कॅफेत 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार; दोघांना अटक अन् तिघांचा शोध सुरु

School Without Walls: मोबाईलच्या दुनियेत हरवली बिनभिंतीची शाळा; निसर्गाकडून शिकण्याची संधीच कमी झाली!

25 नोव्हेंबर 1510... तो दिवस, जेव्हा 'जुने गोवे' पोर्तुगीजांच्या ताब्यात गेले!

SCROLL FOR NEXT