Khalid Mashal Dainik Gomantak
देश

Kerala Serial Blast Case: केरळ साखळी बॉम्बस्फोटमागे हमासचा हात? घटनास्थळी NIA दाखल

Kerala: केरळमधील कलामासेरी येथे प्रार्थना सभेदरम्यान झालेल्या बॉम्बस्फोटाचा संबंध दहशतवादी खालिद मशालशी आहे का?

Manish Jadhav

Kerala Serial Blast Case Hamas Terrorist Khalid Mashal Connection NIA: केरळमधील कलामासेरी येथे प्रार्थना सभेदरम्यान झालेल्या बॉम्बस्फोटाचा संबंध हमासचा दहशतवादी खालिद मशालशी आहे का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

कारण शनिवारीच हमासचा म्होरक्या खालिद मशाल केरळमधील मलप्पुरममध्ये एका कार्यक्रमात सहभागी झाला होता. खालिद व्हर्चुअली कार्यक्रमात सहभागी झाला होता. हे कळल्यानंतर केरळ भाजपचे अध्यक्ष के सुरेंद्रन यांनी चिंता व्यक्त केली होती.

दरम्यान, पॅलेस्टाईन समर्थक रॅलीमध्ये हमासचा म्होरक्या खालिद मशाल याच्या व्हर्चुअली भाषणावरुन भाजपने विरोधी आघाडी आयएनडीआयएला लक्ष्य केले होते. केरळ पोलिसांवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले.

केरळमध्ये (Kerala) अनेक पॅलेस्टाईन समर्थक रॅल्या काढल्या जात असून त्यात खालिद मशाल सहभागी झाल्याचे भाजपने म्हटले होते. शुक्रवारनंतर, शनिवारीही केरळमधील जमात-इस्लामीच्या युथ विंग सॉलिडॅरिटी युथ मूव्हमेंटने रॅली काढली, ज्यामध्ये खालिद सहभागी झाला होता.

कोण आहे हमासचा लीडर खालिद मशाल?

दहशतवादी खालिद मशाल हा हमास (Hamas) पॉलिट ब्युरोचा संस्थापक सदस्य आहे. याआधी खालिद 2017 पर्यंत हमासचा प्रमुख होता. खालिदने अनेक वर्षांपासून हमासचे नेतृत्व केले आहे.

बीबीसीच्या म्हणण्यानुसार, खालिद मशालचा जन्म वेस्ट बँकमध्ये झाला आणि त्याचे पालनपोषण कुवेत आणि जॉर्डनमध्ये झाले. खालिद 2004 मध्ये हमासचा लीडर झाला. खालिद कधीच गाझामध्ये राहत नसल्याचे म्हटले जाते.

जॉर्डन, सीरिया, कतार आणि इजिप्तमध्ये राहून त्याने हमाससाठी काम केले. इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, खालिद मशाल सध्या कतारमध्ये असून त्याची एकूण संपत्ती 4 अब्ज डॉलर आहे.

प्रार्थना सभेत 2000 लोक उपस्थित होते, त्यानंतर स्फोट सुरु झाले

रविवारी म्हणजेच आज प्रार्थना सभेदरम्यान एकापाठोपाठ तीन स्फोट झाले. या स्फोटात एकाचा मृत्यू झाला, तर 30 हून अधिक जण जखमी झाले.

वृत्तानुसार, प्रार्थना सभा सुरु झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत तीन स्फोट झाले. ही घटना कोचीपासून 10 किमी अंतरावर असलेल्या कलामासेरीमध्ये घडली.

स्फोटावेळी झालेल्या प्रार्थना सभेत 2 हजार लोक सहभागी झाले होते. कन्व्हेन्शन सेंटरमध्ये उपस्थित लोकांनी माध्यमांना सांगितले की, पहिला स्फोट प्रार्थनेच्या वेळी झाला.

त्याचवेळी, घटनास्थळी उपस्थित अधिकाऱ्यांनी सांगितले की, विस्फोटक टिफिन बॉक्समध्ये ठेवण्यात आले होते. दुसरीकडे, स्फोटाची माहिती मिळाल्यानंतर केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी याला दुर्दैवी म्हटले आणि परिस्थितीकडे गांभीर्याने पाहिले जात असल्याचे सांगितले.

केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी स्फोटाच्या पार्श्वभूमीवर सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना ड्युटीवर हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

दुसरीकडे, या साखळी बॉम्बस्फोटानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) पथक घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरु केला आहे. एनआयएसह बॉम्बशोधक पथकही घटनास्थळी पोहोचले आहे. याशिवाय, दिल्लीहून एनएसजीची टीमही येथे येत आहे.

एनएसजीकडे बॉम्ब निकामी करणारे पथक आहे, जे घटनास्थळाचा तपास करेल आणि स्फोटादरम्यान कोणती स्फोटके वापरली गेली याची माहिती गोळा करेल.

केरळ बॉम्बस्फोटावर सुधांशू त्रिवेदी म्हणाले...

केरळमधील साखळी बॉम्बस्फोटानंतर भाजपने काँग्रेसवर निशाणा साधला. भाजपचे राज्यसभा खासदार सुधांशू त्रिवेदी म्हणाले की, काँग्रेस पक्ष घातक राजकारण करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 2nd Test: पहिला विजय झाला, आता मालिका विजयाची 'हुकमी तयारी'! दुसरा सामन्याचे सर्व डिटेल्स एका क्लिकवर वाचा

Haryana Crime: तोकडे कपडे आणि चारित्र्यावर संशय... 18 वर्षीय भावाने बहिणीची बॅटने मारहाण करुन केली हत्या; हरियाणातील संतापजनक घटना!

Formula 4 Racing In Goa: गोव्यात होणार प्रतिष्ठीत 'फॉर्म्युला- 4 रेस'; गोमंतकीयांना अनुभवता येणार जागतिक रेसिंग स्पर्धेचा थरार

टीसींना 'बॉडी कॅमेऱ्यांचे' कवच! खोट्या विनयभंगाचे आरोप रोखण्यासाठी होतेय मागणी, तिकीट नसताना टीसीशी हुज्जत घालणाऱ्या महिलेचा Video Viral

Goa Congress: 'भाजप का काँग्रेसविरोधात लढायचंय ठरवा'; भूमिका स्पष्ट करण्याचा माणिकराव ठाकरेंचा 'आप'ला सल्ला

SCROLL FOR NEXT