Priyanka Gandhi Fake PA Calls MLA 3 Crore Dainik Gomantak
देश

Political Scam: 3 कोटी द्या, मंत्रीपद घ्या! आमदार-खासदारांना गंडा घालणाऱ्या ठगांचा पर्दाफाश; प्रियंका गांधींचा बनावट पीए बनून केली कोट्यवधींची मागणी

Priyanka Gandhi Fake PA Calls MLA 3 Crore: देशात सायबर गुन्हेगार आणि ठगांचे धाडस इतके वाढले की, आता सामान्य नागरिकांनंतर थेट खासदार आणि आमदारांनाही गंडा घालण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत.

Manish Jadhav

Kerala MLA MP Cabinet Berth Fraud Scam: देशात सायबर गुन्हेगार आणि ठगांचे धाडस इतके वाढले की, आता सामान्य नागरिकांनंतर थेट खासदार आणि आमदारांनाही गंडा घालण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार केरळमध्ये समोर आला, जिथे राज्य मंत्रिमंडळात मंत्रीपद मिळवून देण्याचे आमिष दाखवून लोकप्रतिनिधींकडून तब्बल 3 कोटी रुपयांची मागणी करण्यात येत होती. मात्र, ऐन वेळी केरळ आणि दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने तत्परता दाखवत या आंतरराज्यीय रॅकेटचा पर्दाफाश केला. या प्रकरणी दिल्लीतील गाझीपूर भागातून नितीन आणि गौरव नावाच्या दोन हायटेक ठगांना अटक करण्यात आली असून, त्यांना ट्रान्सिट रिमांडवर कोझिकोड येथे आणण्यात आले.

कोझिकोड शहराचे पोलीस आयुक्त ए. पी. शौक्कथली यांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर पोलीस पथकाने आरोपींनी (Accused) वापरलेले मोबाईल नंबर, व्हॉट्सॲप अकाउंट्स आणि डिजिटल पुराव्यांचे विश्लेषण करुन या दोघांचा शोध लावला. मुख्य आरोपी गौरव यापूर्वीही इतर राज्यांतील अशाच प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी होता आणि त्याने महाराष्ट्रातील नाशिक कारागृहात काही काळ घालवला. हे दोन्ही आरोपी अत्यंत सुशिक्षित आणि तांत्रिकदृष्ट्या निष्णात असून, त्यातील एकाने कायद्याची पदवी घेतली. आरोपींनी कधी थेट पंतप्रधान कार्यालयाचे नाव सांगून तर कधी व्हीआयपी नेत्यांचे नाव वापरुन खासदार-आमदारांना फोन केले होते.

हा संपूर्ण प्रकार एलाथूरच्या आमदार के. विद्या बालकृष्णन यांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला. एका व्यक्तीने व्हॉट्सॲप कॉल करुन स्वतःला वायनाडच्या खासदार प्रियंका गांधी वाड्रा यांचा पीए असल्याचे सांगितले. केरळमध्ये लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असून, 3 कोटी रुपये दिल्यास मंत्रीपद पक्के केले जाईल, असे आमिष त्याने दिले. 10 मिनिटांच्या या इंग्रजी संभाषणादरम्यान आमदाराला संशय आला. त्यांनी लगेचच प्रियंका गांधी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून खात्री केली असता, हा ठगबाजीचा प्रकार समोर आला.

याच ठगांनी खासदार शफी परंबिल आणि डीन कुरियाकोस यांनाही अशाच प्रकारे फोन केले होते. प्रियंका गांधी यांच्या खऱ्या सचिवाने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी वेगाने सूत्रे हलवून या ठगांच्या मुसक्या आवळल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: जाहीर सभेसाठी आम्हाला सरकारने जागा नाकारली, खासगी जागेवर सभेचे आयोजन करावं लागलं; चोडणकरांचा आरोप

Military Dog Tyson: लष्कराचा श्वान ‘टायसन’ला शौर्यसन्मान, गोळी झाडल्यानंतरही दहशतवाद्यांवर केला होता हल्ला

अमेरिकेत 'इंडिया डे'चा धमाका! 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त न्यू यॉर्कची 'अँपायर स्टेट बिल्डींग' झाली तिरंगामयी; तारक मेहताच्या कलाकारांची खास उपस्थिती

Goa Crocodile Video: गोव्यात घरात घुसली भलीमोठी मगर; कुटुंबाची उडाली तारांबळ, वन विभागाकडून मगरीची सुरक्षित सुटका

PM Modi Mental Naxalism Statement: मोदींच्या ‘बौद्धिक नक्षली’ उल्लेखावरून रणकंदन; विरोधकांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT