State With Most Five Star Hotels in India Dainik Gomantak
देश

Kerala Surpass Goa: गोवा, महाराष्ट्राला मागे टाकत केरळची 'फाईव्ह स्टार' कामगिरी; 'या' क्षेत्रात पोहचले टॉपवर

राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पर्यटकांचा ओघ वाढणार

Akshay Nirmale

State With Most Five Star Hotels in India: देशाच्या दक्षिणेकडील राज्य केरळ आपल्या नवनवीन प्रयोगांमुळे चर्चेत असते. आताही केरळ पुन्हा चर्चेत आले आहे. केरळने 5 स्टार हॉटेल्सच्या बाबतीत महाराष्ट्र, राजस्थान आणि गोवा या पर्यटन असलेल्या राज्यांना मागे टाकले आहे.

देशात सर्वाधिक पंचतारांकित हॉटेल्स असण्याचा मान केरळने मिळवला आहे. केरळमध्ये एकूण 42 पंचतारांकित हॉटेल्स आहेत. नॅशनल डेटाबेस ऑफ हाऊसिंग युनिट्समध्ये उपलब्ध असलेल्या ताज्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे.

केरळने महाराष्ट्र, राजस्थान आणि गोवा या राज्यांना मागे टाकले आहे. ही राज्ये पर्यटक आणि कॉर्पोरेट्ससाठी सोयीची ठिकाणे म्हणून लोकप्रिय आहेत.

अशी आहेत टॉप राज्ये

या राज्यांमधील 5-स्टार हॉटेल्सच्या क्रमवारीनुसार, एकूण 35 पंचतारांकित हॉटेल्ससह महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे, 32 पंचतारांकित हॉटेल्ससह गोवा तिसऱ्या क्रमांकावर आहे, तर राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये 27 फाईव्हस्टार हॉटेल्स आहेत. दिल्ली तिसऱ्या क्रमांकावर आहे.

पंचतारांकित हॉटेल्स केरळ पर्यटन संचालक पी. बी. नोह म्हणाले की, पायाभूत सुविधा आणि सुविधांच्या विकासामध्ये केरळ सरकारची मोठी भूमिका असताना, खाजगी क्षेत्र त्यांना प्रदान केलेल्या सुविधा विकसित करते, ज्यामुळे केरळमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांचा ओघ वाढण्यास मदत होते.

केरळ राज्यातील सर्वाधिक फाईव्ह स्टार हॉटेल्समुळे केरळच्या हॉस्पिटॅलिटी सेक्टरमध्ये वाढ होत आहे

या फायदा केरळला केवळ जास्त मागणी असलेले ठिकाण म्हणून लाभदायी ठरत नाही तर हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात करिअरच्या विकासासाठी अधिक संधी निर्माण करण्यास देखील त्यामुळे मदत होते, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.

केरळच्या आदरातिथ्य आणि पर्यटन उद्योगाच्या प्रचार आणि विकासासाठी त्याचा फायदा निश्चित्तपणे होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT