Goa Monsoon 2023: चिंताजनक! गोव्यात पावसाच्या विश्रांतीने तापमानात वाढ; ऑगस्टमध्ये तूट 93.4 टक्क्यांवर...

देशात पावसाची तूट 7 टक्के
Goa Monsoon Update 2023
Goa Monsoon Update 2023Dainik Gomantak

Goa Monsoon In August 2023: यंदाच्या मॉन्सूनच्या हंगामात राज्यात सुरवातीला पावसाचे प्रमाण कमी होते. पण जूनच्या अखेरीस सुरू झालेल्या पावसाने नंतर दमदार हजेरी लावत सरासरी भरून काढली. तथापि, ऑगस्टमध्ये मात्र पुन्हा गोव्यात पावसाने विश्रांती घेतली आहे, त्यामुळे तापमानात वाढ झाली आहे.

गोव्यात ऑगस्टमध्ये 167.1 मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे या महिन्यातील तूट 93.4 टक्के झाली आहे. ऑगस्टमधील संपूर्ण देशातील पावसाचा विचार करता देशात पावसाची तूट 7 टक्के इतकी आहे.

ऑगस्टमध्ये पावसाचे इतके कमी प्रमाण असणे हे चिंता करण्यासारखे आहे, असे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. केवळ गोवाच नाही तर भारतीय उपखंडातील अनेक भागात पावसाची कमतरता आहे.

Goa Monsoon Update 2023
Birsa Munda Statue at Goa: परशुरामानंतर आता राज्यात उभारणार बिरसा मुंडा यांचा पुतळा- सावंत

कुठे किती पाऊस झाला?

गोव्यातील 13 पर्जन्यमापक केंद्रांपैकी आतापर्यंत एकाही ठिकाणी चांगला पाऊस झालेला नाही. केपे स्थानकात 1 ते 22 ऑगस्ट या कालावधीत सर्वाधिक 232.4 मिमी पाऊस पडला आहे. याच कालावधीत मडगाव स्थानकात केवळ 71.6 मि.मी. तर, पणजीत 115.4 मि.मी. पाऊस झाला आहे.

प्रत्येक मॉन्सून हंगामात पावसाची एक सरासरी ठरलेली असते. त्यानुसार जूनमध्ये सरासरी 31.28 टक्के पाऊस होतो. तर जुलैमध्ये सरासरी 35.75 टक्के पाऊस होतो. त्यानंतर ऑगस्टमध्ये 22.37 टक्के आणि सप्टेंबर महिन्यात 10.58 टक्के सरासरी पाऊस होत असतो.

वर्षभर जितका पाऊस भारतात होतो त्यात नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाचा वाटा 90 टक्केहून अधिक आहे. गोव्यात सुमारे 644 मिमी पाऊस पडणे अपेक्षित होता, परंतु 1 ऑगस्ट ते 23 ऑगस्टपर्यंत फारच कमी पाऊस झाला आहे.

Goa Monsoon Update 2023
Goa Petrol Diesel Price: गोव्यातील पेट्रोल-डीझेल दरामध्ये वाढ; जाणून घ्या आजच्या किंमती...

तापमानात वाढ

वाळपईचे कमाल तापमान 36 अंश सेल्सियसवर आहे. काणकोणमध्ये, 32.4, पणजीमध्ये 32 आणि वास्को द गामा येथे 29.1 सेल्सियस तापमान नोंदवले गेले आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अल्तिनो येथील डॉपलर रडारवर कमी ढग दिसत आहेत.

त्यामुळे सौर किरण थेट पृथ्वीवर येतात. ढगांची अनुपस्थिती, कमी वारे, जास्त आर्द्रता यामुळे तापमान वाढल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com