Kerala Governor Arif Mohammad Khan Twitter / @ANI
देश

Kerala: राज्यपाल आरिफ मोहम्मद यांनी कन्नूर हल्ल्याचा व्हिडिओ केला जारी, LDF सरकारला घेराव

Kerala Governor Arif Mohammad Khan: राज्याच्या डाव्या लोकशाही आघाडी (LDF) सरकारसोबत सुरु असलेल्या वादाच्या दरम्यान एक अनपेक्षित पाऊल उचलले आहे.

दैनिक गोमन्तक

Kerala Governor Shares Video: केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी राज्यातील डाव्या लोकशाही आघाडी (LDF) सरकारसोबत सुरु असलेल्या वादाच्या दरम्यान एक अनपेक्षित पाऊल उचलले आहे. 2019 मध्ये कन्नूर विद्यापीठात झालेल्या एका कार्यक्रमात त्यांना कथितपणे त्रास दिल्याचा व्हिडिओ जारी केला आहे. ही क्लिप आता त्यांनी मीडियासोबत शेअर केली आहे. राज्यपाल खान यांनी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी पाठवलेली पत्रे आणि राज्य विद्यापीठांच्या कामकाजाबाबत त्यांनी माध्यमांना दिलेली उत्तरेही प्रसिद्ध केली आहेत.

राज्यपालांनी राजभवन सभागृहात व्हिडिओ दाखवला

राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी राजभवन सभागृहात लावलेल्या दोन मोठ्या स्क्रीनवर घटनेचे व्हिडिओ दाखवले. ते म्हणाले की, 'या व्हिडिओमध्ये एक वरिष्ठ अधिकारी पोलिसांना त्यांचे काम करण्यापासून रोखताना दिसत आहे.' हा अधिकारी आता मुख्यमंत्री कार्यालयात कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.

गव्हर्नर आरिफ मोहम्मद खान (Arif Mohammad Khan) पुढे म्हणाले, 'रागेशने पोलिसांना त्यांचे काम करण्यापासून रोखले होते. कदाचित त्यामुळेच त्याला बक्षीस मिळाले असावे. कन्नूर विद्यापीठातील आंदोलन उस्फूर्तरित्या झालं असेल तर, काही आंदोलकांनी पोस्टर तयार करुन आणलेच कसे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

दुसरीकडे, आरीफ खान यांनी आरोप केला की, राज्य सरकारचे संपूर्ण लक्ष वेगवेगळ्या विचारांच्या लोकांना गप्प करण्यावर आहे. यामध्ये त्यांनी राजभवन देखील सोडले नाही. कर्मचारी भरतीबाबत चौकशी करुन सरकारने (Government) राजभवनाच्या कामकाजात हस्तक्षेप करण्याचाही प्रयत्न केला, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केल्याचे त्यांनी सांगितले.

दबाव निर्माण करण्याचे धोरण अजूनही अवलंबले जात आहे: राज्यपाल

राज्यपाल पुढे म्हणाले, 'त्यांना त्यांची चूक मान्य करावी लागली. मला माहित होते की, ती व्यक्ती निर्दोष आहे, परंतु मला हा संदेश द्यायचा होता की, हे जबरदस्तीचे डावपेच माझ्यासाठी कार्य करणार नाहीत. मात्र यानेही त्यांचे डोळे उघडले नाहीत. दबाव निर्माण करण्याच्या धोरणांचे अजूनही पालन केले जात आहे. या आणि इतर कारणांमुळे मला आता हा मुद्दा उपस्थित करावा लागला आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT