Covid-19 Dainik Gomantak
देश

Covid-19: केरळ सरकारने बिकट परिस्थितीत बदलला अंत्यसंस्काराचा प्रोटोकॉल

केरळ सरकारने (Kerala Government) मंगळवारी कोविड -19च्या (Covod-19) रूग्णांचे मृतदेह (Death body) त्यांच्या घरी नेण्यासाठी परवानगी दिली आहे.

दैनिक गोमन्तक

तिरुवनंतपुरम: केरळ (Kerala) राज्यात कोरोना साथीमुळे (Covid-19) सध्याच्या परिस्थितीत गंभीर वातावरण निर्माण झाले आहे, परंतु केरळ सरकारने मंगळवारी कोविड -19च्या रूग्णांचे मृतदेह (Death body) त्यांच्या घरी नेण्यासाठी परवानगी दिली आहे. जेणेकरून नातेवाईक त्यांचा अंतिम संस्कार करू शकतील. कोविड प्रोटोकॉलनुसार देशात आतापर्यंत कोविड मृतदेह घरात ठेवण्याची परवानगी नव्हती. मात्र केरळ सरकारने यासाठी परवानगी दिली आहे. देशातील कोरोनाची दुसरी लाट थांबत असल्याचे दिसत असतानाच केरळमध्ये कोरोनाची प्रकरणे वाढत आहे. (Kerala government changed the protocol of the funeral in Covid dire situation)

मागील आठवड्यापर्यंत राज्यात कोरोना रूग्णसंख्येचे प्रमाण 10 टक्क्यांच्या जवळपास होते, तर देशात हा दर 2.74 टक्के होता. देशातील 5.52 लाख सक्रिय प्रकरणांपैकी एकट्या केरळमध्ये एक लाख प्रकरणे आहेत. आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की या कोरोना साथीच्या कालात सर्वात मोठा मुद्दा म्हणजे नातेवाईक त्यांच्या प्रियजनांचे मृतदेह पाहू शकत नाहीत.

अंत्य विधीसाठी एक तासाचा वेळ

घरातील लोकांच्या आस्थेपोटी कोविड रूग्णांचे मृतदेह ठराविक वेळेसाठी आणि अंतिम विधीसाठी त्याच्या नातेवाईकांकडे ठेवण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे. या अंतिम विधीसाठी एक तास दिला जाईल. त्यानुसार सुरक्षित अंतर ठेवून आणि प्रत्येकाने आपली काळजी घेवून हे विधी करणे गरजेचं आहे. दिसरीकडे पाहायला गेलं तर राज्यातील परिस्थिती अद्याप चिंताजनक असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की सरासरी टीपीआर अजूनही दहा टक्क्यांच्या वर आहे. आम्ही हळूहळू टीपीआर 29.75 वरून 10 टक्क्यांपर्यंत कमी करू शकलो आहोत, परंतु अपेक्षेप्रमाणे या आकडेवारीमद्ये घट झाली नाही. टीपीआर 10 टक्क्यांच्या खाली जात नाही ही चिंतेची बाब आहे. गेल्या आठवड्यातील आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की कोविड पॉझीटिव्ह प्रकरणांमध्ये कोणतीही घट झाली नाही.

मृतदेह घेवून माणसांना रांगेत उभे असतांना पाहिले

ते म्हणाले की, कोरोनाच्या डेल्टा विषाणूचा राज्यात प्रसारहोत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनामुले अनेकांचे बळी गेले. हा संसर्ग राज्यात खूप मोठ्या प्रमाणात पसरत गेला. आता राज्याने असे धोरण अवलंबले की येथे दुसऱ्या लाटेला आटोक्यात आणण्यासाठी पायाभूत सुविधांचे व्यवस्थापन करता येईल. मी स्मशानभूमीत मृतदेह घेवून माणसांना रांगेत उभे असतांना पाहिले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

राज्यातली दुसरी लाट नियंत्रणात येण्यास वेळ लागेल

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, केरळमधील ही भयावह परिस्थिती बदलण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. केरळमध्ये सध्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा प्रभाव कमी होण्यास थोडा आणखी वेळ लागेल. राज्यात आत्तापर्यंतचे निर्बंध शिथिल करण्याची कोणतीच चिन्हं दिसत नाही. आणि आता अशातच तिसऱ्या लाटेची भितीही वर्तविली जात आहे. अशा परिस्थितीत आंतरराज्यीय चेक पोस्ट आणि रेल्वे स्थानकांवरील चाचण्या आणखी सक्तिच्या करण्यात आल्या आहेत. असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT