चंदिगढ: आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुशंगाने विजबीलाच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली असल्याचे पहायला मिळते आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी वीजेबीलासंदर्भात तीन मोठ्या घोषणा केल्या. पंजाबमधील विजेचे संकट आणि महागड्या विजेचा मुद्दा उपस्थित करीत ते म्हणाले की, राज्यात आम आदमी पक्षाचे सरकार आल्यास दिल्लीच्या धर्तीवर स्वस्त वीज स्वस्त दरात देऊ. राज्यातील प्रत्येक घरात 300 युनिट्स पर्यंत वीज विनाशुल्क दिली जाईल. जुनी वीज बिले माफ केली जातील आणि 24 तास वीज राज्यात दिली जाईल अशा माठ्या घोषणा त्यांनी यावेळी केल्या आहे. (Arvind Kejriwal has made big announcements on the backdrop of Punjab elections)
इथल्या खासगी वीज कंपन्या आणि पंजाब सरकार यांच्यातील संबंधांमुळे राज्यात वीज महाग आहे. पंजाबमध्ये राज्याच्या गरजेपेक्षा जास्त वीज निर्मिती केली जात आहे, तरी सुद्धा इथे ही देशातील सर्वात महाग वीज पंजाबमध्ये आहे. तर दुसरीकडे दिल्लीत वीज निर्मिती होत नाही, परंतु देशात सर्वात स्वस्त वीज दिल्लीत आहे.
विज महाग असल्यामुळे लोकांचे हाल होत आहेत. लोकांच्या उत्पन्नापैकी निम्मे उत्पन्न वीज बिल भरण्याच्या दिशेने जाते. यामुळे, महिला अस्वस्थ आहेत. घर कसे चालवायचे हे हा मोठा प्रश्न महिलांसमोर निर्माण झाला आहे असेही अरविंद केजरीवाल यांनी पुढे सांगितले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार बनल्यास राज्यातील प्रत्येक घरात 300 युनिटपर्यंत मोफत वीज उपलब्ध होईल. दिल्लीमध्ये आम्ही 200 युनिट वीज तर अर्ध्या दराने 200 ते 400 युनिट वीज देत आहोत. म्हणूनच आम्ही पंजाबमधील 300 युनिट्सला मोफत वीज देऊ. यामुळे 77 ते 80 लोकांचे वीज बिल शून्य होईल. वीज येईल आणि 24 तास येतील, परंतु वीज बिल येणार नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.