Karun Nair Dainik Gomantak
देश

Karun Nair: ट्रिपल सेंच्युरीचा हीरो, पण कमबॅकमध्ये झिरो; 8 वर्षांनी संधी मिळालेल्या करुण नायरचा 'फ्लॉप शो' कायम

Ind vs Eng 1st Test: भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीत करुण नायरला भारतीय संघात पुनरागमन करण्याची सुवर्णसंधी मिळाली.

Sameer Amunekar

Ind vs Eng 1st Test

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीत करुण नायरला भारतीय संघात पुनरागमन करण्याची सुवर्णसंधी मिळाली. तब्बल ३००६ दिवसांनंतर, म्हणजेच सुमारे ८ वर्षांनंतर, करुण नायरला टेस्ट प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालं. मात्र, ही संधी त्याच्यासाठी ‘फ्लॉप ’ ठरल्याचं पाहायला मिळत आहे.

करुण नायरने २०१६ साली इंग्लंडविरुद्धच ऐतिहासिक नाबाद ३०३ धावांची खेळी करत सर्वांना थक्क केलं होतं. तो भारतीय कसोटी क्रिकेटमध्ये तिहेरी शतक ठोकणारा फक्त दुसरा फलंदाज ठरला. मात्र त्या नंतर त्याचा फॉर्म अचानक खालावला आणि तो संघाबाहेर फेकला गेला. २०१७ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने शेवटचा कसोटी सामना खेळला होता.

कमबॅकमध्ये निराशाजनक कामगिरी

या कसोटीत पहिल्या डावात फलंदाजी करताना नायर फक्त ४ चेंडूत शून्यावर बाद झाला. बेन स्टोक्सच्या चेंडूवर ऑली पोपने त्याचा अप्रतिम झेल घेतला. दुसऱ्या डावात त्याने २० धावा केल्या, पण ही खेळी पुरेशी ठरली नाही. अशा प्रकारे दोन्ही डावांत त्याचा प्रभावी ठसा उमटला नाही, आणि त्याचं पुनरागमन फिकं ठरलं.

पुनरागमनासाठी मेहनत

करुण नायरने गेल्या काही वर्षांत देशांतर्गत क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी केली. इंडिया अ विरुद्ध इंग्लंड लायन्स कसोटीत त्याने २०४ धावांची खेळी करत निवडकर्त्यांचं लक्ष वेधलं. २०२२ मध्ये कर्नाटक रणजी संघातून वगळल्यानंतर, त्याने विदर्भ संघातून नवी सुरुवात केली आणि २०२४-२५ च्या हंगामात रणजी ट्रॉफी विजेत्या विदर्भ संघाचा प्रमुख आधारस्तंभ ठरला. याच हंगामात त्याने ८६३ धावा (सरासरी ५३.९३) केल्या.

तसंच, नॉर्थम्प्टनशायरकडून काउंटी क्रिकेट खेळताना त्याला परदेशातही अनुभव मिळाला. या संपूर्ण कालावधीत नायरने फलंदाज म्हणून आपली क्षमता सिद्ध करत राहिली.

करुण नायरचा कसोटी संघातील समावेश हा केवळ आकड्यांच्या आधारे नव्हता, तर त्याच्या अनुभव, संयम आणि मोठी खेळी खेळण्याच्या क्षमतेवर आधारित होता. मात्र, ८ वर्षांची प्रतीक्षा करून आलेल्या या संधीचं त्याचं रुपांतर अपयशात झाल्याचं चित्र पहिल्या सामन्यानंतर समोर आलं आहे.

आता पुढे काय?

करुण नायरचा फ्लॉप शो पुढेही सुरू राहणार की तो आगामी सामन्यांमध्ये पुनरागमन करत आपलं स्थान पुन्हा मजबूत करणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. भारतीय संघ व्यवस्थापन त्याला आणखी एक संधी देणार का, हे आगामी दिवसांत स्पष्ट होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hardik Pandya Video: हार्दिकच्या धडाकेबाज खेळीवर गर्लफ्रेंड फिदा! सोशल मीडियावर रंगली 'फ्लाइंग किस'ची चर्चा; मैदानावरच प्रेमाचा वर्षाव

IND vs SA 5th T20: अहमदाबादमध्ये हार्दिक पांड्याचं वादळ, 16 चेंडूत ठोकलं अर्धशतक; अभिषेक शर्माचा मोडला रेकॉर्ड VIDEO

..तांबडया समुद्रातून बेट मागे टाकल्यावर बोट 'सुएझ कालव्या'त शिरली! गोव्यासाठी लढलेल्या वीरांच्या कारावासातल्या भयाण आठवणी

U19 Asia Cup 2025: भारताचा श्रीलंकेला विजयाचा 'धोबीपछाड'; फायनलमध्ये रंगणार भारत-पाक हायव्होल्टेज थरार! VIDEO

Rahu Gemstone: राहुची महादशा अन् गोमेद रत्नाचा चमत्कार! 'या' 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार; जाणून घ्या फायदे आणि महत्त्वाचे नियम

SCROLL FOR NEXT