केंद्र सरकारने (Central Government) कर्तापूर साहिब कॉरिडॉर (Kartapur Sahib Corridor) 17 नोव्हेंबरपासून पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah) यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. त्यांनी ट्विट करुन म्हटले की, 'एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे, ज्याचा फायदा मोठ्या संख्येने शीख यात्रेकरुना होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने करतारपूर साहिब कॉरिडॉर उद्यापासून म्हणजेच 17 नोव्हेंबरपासून पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय मोदी सरकारचा श्रीगुरु नानक देवजी आणि आपल्या शीख समुदायाप्रती असलेला अपार आदर दर्शवतो.
कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे मार्च 2020 मध्ये करतारपूर साहिब गुरुद्वाराची यात्रा स्थगित करण्यात आली होती. तत्पूर्वी, पंजाबमधील भारतीय जनता पक्षाच्या (BJP) नेत्यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि त्यांना गुरुपूरापूर्वी करतारपूर कॉरिडॉर पुन्हा सुरु करण्याची विनंती केली. भाजपच्या पंजाब युनिटच्या अध्यक्षा अश्विनी शर्मा यांनी सांगितले की, 11 राज्यांच्या नेत्यांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि त्यांना गुरु नानक देवजींच्या अनुयायांच्या भावनांची माहिती दिली.
पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी करतारपूर कॉरिडॉरच्या उद्घाटनाचे स्वागत केले आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले, 'स्वागत आहे, अनंत शक्यतांचा कॉरिडॉर पुन्हा उघडला गेला आहे. नानक नाव घेणाऱ्यांना एक अनमोल भेट. सर्वांवर आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी महान गुरुंचा मार्ग सदैव खुला राहो.
पाकिस्तानने कॉरिडॉर उघडण्याची विनंती केली होती
त्याच वेळी, पाकिस्तानने मंगळवारी भारताला आपल्या वतीने करतारपूर कॉरिडॉर पुन्हा उघडण्याची आणि शीख यात्रेकरूंना गुरु नानक देव यांच्या जयंतीनिमित्त आयोजित उत्सवासाठी पवित्र स्थळाला भेट देण्याची विनंती केली. पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने सांगितले की, "भारताने अद्याप आपल्या बाजूने कॉरिडॉर उघडला नसून यात्रेकरुंना करतारपूर साहिबला भेट देण्याची परवानगी दिली नाही." आम्ही त्या दिवसासाठी भारत आणि जगभरातील यात्रेकरुंचे आयोजन करण्यास उत्सुक आहोत." पंतप्रधान इम्रान खान यांनी उद्घाटन केले. गुरु नानक देव यांच्या 550 व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला 9 नोव्हेंबर 2019 रोजी करतारपूर कॉरिडॉर खुला करण्यात आला होता.
19 नोव्हेंबर रोजी गुरुपर्व साजरा होणार आहे
करतारपूर कॉरिडॉर पाकिस्तानमधील करतारपूर साहिब गुरुद्वाराला भेट देणाऱ्या भारतातील यात्रेकरुंना व्हिसा-मुक्त प्रवेश प्रदान करतो. हे गुरुद्वारा करतारपूर साहिब, शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देव यांचे अंतिम विश्रामस्थान, भारतातील गुरुदासपूर जिल्ह्यातील डेरा बाबा नानक मंदिराशी जोडते. गुरु नानक यांची जयंती म्हणून साजरे होणारे गुरुपर्व यावर्षी 19 नोव्हेंबर रोजी साजरे होणार आहे. गुरुद्वारा करतारपूर साहिब हे शीख धर्माच्या अनुयायांसाठी सर्वात पवित्र ठिकाणांपैकी एक आहे. ते पुन्हा उघडणे हा पंजाबसाठी भावनिक मुद्दा आहे. त्यामुळे काँग्रेस आणि अकाली दलासह सर्व पक्ष ते पुन्हा सुरु करण्याची मागणी करत आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.