Karnataka covid guidelines Dainik Gomantak
देश

Karnataka covid guidelines: RT-PCR निगेटिव्ह आल्यानंतरही प्रवाशांना रहावे लागणार क्वारंटाइन

आफ्रिकेहून कर्नाटकमध्ये आलेल्या दोन प्रवाशांना कोरोना असल्याचे समोर आले आणि भारतात खळबळ उडाली होती.

दैनिक गोमन्तक

बंगळूर: ओमिक्रॉनचा (Omicron Variant) नवीन प्रकार जगातील अनेक देशांमध्ये आढळून आल्यानंतर भारतातील (India) आरोग्य संस्थाही सतर्क झाल्या आहेत . अलीकडेच दक्षिण आफ्रिकेतील (SouthAfrica) दोन लोकांना कोविडची (Covid-19) लागण झाल्याचे आढळून आले आहे, परंतु अद्यापपर्यंत हे स्पष्ट झाले या नव्या विषाणूची लागन अन्य कोणाला झाली की नाही हे स्पष्ट झाले नाही.

हा विषाणू आढळल्यापासून दक्षिण आफ्रिकेत निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या नव्या 'ओमिक्रॉन' (Omicron) व्हेरिअंटने गेल्या चार दिवसांत 11 देशांमध्ये धुमाकुळ घातला आहे. अशावेळी आफ्रिकेहून कर्नाटकमध्ये आलेल्या दोन प्रवाशांना कोरोना असल्याचे समोर आले आणि भारतात खळबळ उडाली होती. सुदैवाने या दोघांनाही ओमीक्रॉन व्हेरिअंटची लागण नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

कर्नाटक राज्यातील बंगलोर विमानतळावर स्वच्छता आणि कोविड चाचणी आधिक कडक करण्यात आली आहे, तर दुसरीकडे राज्य सरकारने सात दिवसांचे क्वारंटाईन अनिवार्य केले आहे. अबू धाबीला जाणाऱ्या एका व्यक्तीने सांगितले की, "आरटी-पीसीआर अहवाल नकारात्मक असूनही, अधिकाऱ्यांनी आमची दुसरी चाचणी करून घेतली आणि प्रति व्यक्ती कडून 3000 रुपये आकारले."

बंगळुर ग्रामीण जिल्हा आरोग्य अधिकारी टिपेस्वामी यांनी कन्नूर इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (KIAL) ला भेट दिल्यानंतर सांगितले की, कोविड निगेटिव्ह आढळून आलेल्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांना बेंगळुरूमध्ये आल्यावर 7 दिवस क्वारंटाईनमध्ये ठेवावे. 7 दिवसांनी त्यांची पुन्हा चाचणी केली जाईल, सध्या राज्यात असे 598 प्रवासी निरीक्षणाखाली आहेत. आरटी-पीसीआर चाचणी आणि लसीकरण अहवालाशिवाय केरळ आणि महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांच्या प्रश्नावर आम्ही चर्चा केली आहे. आम्ही आधीच एअरलाइन्सना प्रत्येक प्रवाशांची कसून तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत आणि अहवाला तपासल्याशिवाय कोणालाही प्रवास करू देऊ नये, असे निर्देश दिले.

कर्नाटकात आज सोमवारी कोरोना विषाणूचे 257 नवीन रुग्ण आढळले आणि आणखी पाच संक्रमित लोकांचा मृत्यू झाला. यानंतर एकूण रुग्णांची संख्या 29,95,857 झाली असून मृतांचा आकडा 38,203 वर पोहोचला आहे. आरोग्य विभागाने आपल्या कोविड बुलेटिनमध्ये म्हटले आहे की, संसर्गातून बरे झाल्यानंतर आणखी 205 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे आणि संसर्गमुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 29,50,747 वर गेली आहे.

राज्यात कोविड उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 6867 वर पोहोचल्याचे सांगण्यात आले. बंगळुर शहरी जिल्ह्यात सर्वाधिक 131 नवीन रुग्ण आढळले आहेत आणि दोन संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. यानंतर तुमकुरूमध्ये 23, हसनमध्ये 21 आणि म्हैसूरमध्ये 14 प्रकरणे आढळून आली आहेत. कोविड बुलेटिननुसार, सोमवारी 4,06,470 लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे, त्यानंतर आतापर्यंत 7.37 कोटी लोकांना लस देण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai - Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गाबाबत मोठी अपडेट, मुख्य बोगदा १५ दिवस राहणार बंद

Bhopal Goa Flight: भोपाळ ते गोवा थेट विमानसेवा! पहिल्यांदाच 180 आसनी क्षमतेचे बोईंग प्रवाशांच्या सेवेत

IPL Auction: 13 वर्षीय वैभव सूर्यवंशीवर पडला पैशांचा पाऊस, RR च्या ताफ्यात सामील; संजूच्या नेतृत्वाखाली करणार गर्दा!

धक्कादायक! 'गोवा सोड अन्यथा..', धमकी देत मारहाण करणाऱ्या 'मगो'च्या नेत्याला अटक

Goa Cabinet: दोन दिवसांत गोवा मंत्रीमंडळात फेरबदल? मुख्यमंत्री सावंतांची दिल्लीत खलबंत, मंत्री-नेत्यांशी भेटीगाठी

SCROLL FOR NEXT