कोण आहेत मुंबईकर पराग अग्रवाल जे आता बनलेत ट्विटरचे 'बॉस'

पराग अग्रवाल हे आतापर्यंत ट्विटरचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (CTO) होते आणि संपूर्ण तांत्रिक जबाबदारी सांभाळत होते.
Who is Parag Agrawal new CEO of Twitter
Who is Parag Agrawal new CEO of Twitter Dainik Gomantak
Published on
Updated on

मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरचे (Twitter) सह-संस्थापक जॅक डोर्सी (Jack Dorsey) यांनी कंपनीचे सीईओ (CEO) पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या जागी आता भारतीय वंशाचे पराग अग्रवाल (Parag Agrawal) जबाबदारी सांभाळतील. ट्विटरच्या सीईओपदी पराग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉर्सी यांनी पराग अग्रवाल यांची सीईओ पदावर नियुक्ती केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले आहे.(Who is Parag Agrawal new CEO of Twitter)

डोर्सीयांनी परागचे कौतुक केले आणि सांगितले की, ट्विटरचे सीईओ म्हणून पराग यांच्यावर त्यांचा गाढ विश्वास आहे. गेल्या 10 वर्षात त्यांनी केलेले काम अभूतपूर्व आहे. डॉर्सी पुढे म्हणाले की ते परागचे मन, व्यक्तिमत्व आणि कार्यक्षमतेचे कौतुक करतात आणि खूप आभारी आहेत. आता त्यांच्यावर नेतृत्व करण्याची वेळ आली आहे.

पराग अग्रवाल हे आतापर्यंत ट्विटरचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (CTO) होते आणि संपूर्ण तांत्रिक जबाबदारी सांभाळत होते. डोर्सी यानाच्या म्हणण्यानुसार, पराग अग्रवाल यांनी ट्विटरमध्ये इंजिनिअर म्हणून करिअरची सुरुवात केली होती. आता ते सीईओ पदाची सूत्रे हाती घेणार आहेत.परागच्या शिक्षणाबद्दल सांगायचे तर, त्यांनी कॉम्प्युटर सायन्समध्ये डॉक्टरेट केली आहे. त्यांनी आयआयटी बॉम्बेमधून अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. यानंतर त्यांनी अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील स्टॅनफोर्ड विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्समध्ये पीएचडी केली आहे.

Who is Parag Agrawal new CEO of Twitter
लेहच्या पूर्व भागात भूकंपाचे धक्के

पराग अग्रवाल यांनी 2011 मध्ये ट्विटर कंपनी जॉईन केली होती. तेव्हापासून ते फक्त ट्विटरवर काम करत आहेत. 2017 मध्ये त्यांना कंपनीचे सीटीओ बनवण्यात आले. जेव्हा ते कंपनीत रुजू झाला तेव्हा कर्मचाऱ्यांची संख्या 1000 पेक्षा कमी होती. ट्विटरवर येण्यापूर्वी पराग यांनी मायक्रोसॉफ्ट आणि याहूमध्येही काम केले आहे.

11.41 कोटींच्या संपत्तीचे मालक

पराग अग्रवाल हे Twitter च्या Bluesky प्रयत्नांचे नेतृत्व करत होते, ज्याचे उद्दिष्ट सोशल मीडियासाठी खुले आणि विकेंद्रित मानक तयार करणे होते. CTO या नात्याने, पराग हे ट्विटरच्या तंत्रज्ञान रणनीती आणि ग्राहक महसूल आणि विज्ञान संघांमध्ये मशीन लर्निंग आणि AI ची देखरेख करण्यासाठी जबाबदार होते. हिंदुस्तान टाईम्सने पीपलएआयचा हवाला देत पराग अग्रवालची अंदाजे एकूण संपत्ती 1.52 दशलक्ष डॉलर म्हणजेच 11,41,91,596 रुपये असल्याचे सांगितले आहे.

ट्विटरच्या सीईओपदी नियुक्ती झाल्यानंतर पराग अग्रवाल यांनी ट्विटरवर जॅक डोर्सी यांचे आभार मानले आहेत. त्यांनी लिहिले की, त्यांच्या नियुक्तीबद्दल मी खूप सन्मानित आणि आनंदी आहे. त्यांनी सतत मार्गदर्शन आणि मैत्रीसाठी डॉर्सी यांचे आभार मानले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com