निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार दुपारी 4 पर्यंत कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसला 136 जागा मिळताना दिसत आहेत. 82 जागांवर काँग्रेसने विजय मिळवला असून 54 जागांवर काँग्रेसचा उमेदवार आघाडीवर आहे. तर भाजपने 44 जागांवर विजय मिळवला असून 20 जागांवर भाजप आघाडीवर आहे.
जनता दल सेक्युलरने 14 जागा जिंकल्या असून 6 जागांवर हा पक्ष आघाडीवर आहे. अपक्षांनी दोन जागा जिंकल्या आहेत. सर्वोदय कर्नाटक पक्ष आणि कल्याण राज्य प्रगती पक्ष या पक्षांनी प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मतदारांनी दिलेला कौल हा आगामी लोकसभा निवडणुकीतील महत्वाचा टप्पा आहे. आशा आहे, राहुल गांधी पंतप्रधान होतील, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी व्यक्त केली आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पराभव मान्य केला. त्यांनी या निकालावर पहिली प्रतिक्रिया देताना लोकसभा निवडणुकीसाठी आणखी जोमाने काम करू, असे म्हटले आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांचे पुत्र प्रियांक खरगे यांनी चितापूर मतदारसंघातून विजय मिळवला आहे. खरगे हे काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यानंतर काँग्रेसला प्रथमच कर्नाटकात हा मोठा विजय मिळताना दिसत आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी कनकपुरा मतदारसंघातून सुमारे एक लाख मताधिक्क्याने विजय मिळवला आहे.
बेळगाव दक्षिण मतदारसंघातून भाजपचे अभय पाटील विजयी झाले आहेत. येथे महाराष्ट्र एकीकरण समितीचा उमेदवार पराभूत झाला आहे.
कर्नाटकात काँग्रेसने बहुमताकडे वाटचाल सुरू केल्यानंतर पक्षाच्या स्तरावर हाचचालींना वेग आला आहे. उद्या, 14 मे रोजी कर्नाटकातील निवडून आलेल्या काँग्रेस आमदारांची अर्थात काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे.
बेळगावमधील यमकणमर्डी येथून काँग्रेसचे सतीश जारकीहोळी आघाडीवर असून त्यांचा विजय निश्चित्त मानला जात आहे. तर अथणीमधून लक्ष्मण सवदी हे देखील आघाडीवर असून त्यांचाही विजय निश्चित्त मानला जात आहे. सवदी हे पुर्वी भाजममध्ये होते, या निवडणुकीपुर्वी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. याशिवाय भाजपचे अभय पाटील देखील बेळगावमध्ये आघाडीवर आहेत. बेळगावमध्ये एकूण 18 मतदारसंघ आहेत.
काँग्रेसने कर्नाटकात 127 जागांवर आघाडी घेतल्याचे समोर येत आहे. दरम्यान, सध्या कर्नाटकातील 6 जागांवरील विजय झाल्याचे समोर येत आहे. पैकी 5 जागांवर काँग्रेसने विजय मिळवला आहे तर एका जागेवर जनता दल सेक्युलरच्या उमेदवाराचा विजय झाल्याचे समोर येत आहे. तथापि, निवडणूक आयोगाने अद्याप हे घोषित केलेले नाही. यातील काही ठिकाणची किरकोळ मतमोजणी अद्याप बाकी आहे.
कर्नाटकात पहिला निकाल हाती आला असून काँग्रेसचे टी. रघुमुर्ती विजयी झाले आहेत. दरम्यान, कर्नाटकात काँग्रेसने स्वबळावर सत्तेच्या दिशेने वाटचाल सुरू केल्याचे दिसत आहेत. सध्या काँग्रेस 120 जागांवर आघाडीवर आहे. बहुमताचा आकडा 113 आहे. दरम्यान, भाजप 69 तर जेडीएस 26 जागांवर आघाडीवर आहे.
कर्नाटकात काँग्रेस स्वबळावर सत्तेत येण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे दिसून येत आहे. सुरवातीच्या कलांमध्ये काँग्रेस 115 जागांवर आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. भाजप 73 तर जेडीएस 29 जागांवर आघाडीवर आहे.
कर्नाटक निवडणूक निकालांमध्ये सुरवातीच्या कलांमध्ये काँग्रेस आघाडीवर दिसत आहे. काँग्रेस ११६ जागांवर आघाडीवर दिसत असून आता काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री कोण, याची चर्चा सुरू झाली आहे. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि विद्यमान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांची नावे चर्चेत आली आहेत. सकाळीच सिद्धरामय्या यांचे पुत्र यतिंद्र यांनी सिद्धरामय्या हेच मुख्यमंत्री व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली होती.
कर्नाटक निवडणूक निकालात सुरवातीच्या कलांमध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. काँग्रेस बहुमतापासून केवळ दोन ते तीन जागा दूर आहे, असे सध्याच्या कलांमध्ये दिसत आहे. त्यामुळे काँग्रेसने सर्व आमदारांना बंगळुरात बोलावले आहे. दरम्यान, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बंगळुरूत बैठक सुरू झाली आहे. सर्व आमदारांना बंगळुरूमध्ये एकत्र करून त्यांना हैदराबादला नेले जाणार असल्याचे समजते.
कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालात काँग्रेस बहुमताच्या दिशेने वाटचाल करत आहे. सुरवातीच्या कलानुसार 224 मतदारसंघापैकी 209 जागांचे कल हाती आले आहेत. भाजप 71 जागांवर तर जनता दल सेक्युलर 23 जागांवर आघाडीवर आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार हे कनकपुरा मतदारसंघातून आघाडीवर आहेत. तर जगदीश शेट्टर हे हुबळी-धारवाड मध्य मतदारसंघातून पिछाडीवर आहेत.
कर्नाटक निवडणूक निकालाच्या कलांमध्ये काँग्रेस आघाडीवर दिसत असल्याने सरकार स्थापनेच्या दृष्टीने काँग्रेस सावधपणे पावले उचलत आहेत. सर्व विजयी उमेदवार आमदारांना काँग्रेसने राजधानी बंगळुरूमध्ये येण्याची सूचना केली आहे.
एक्झिट पोल आणि सध्याच्या कलानुसार कर्नाटकात काँग्रेस पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येत असतानाच आता काँग्रेसमधून मुख्यमंत्रीपदाबाबत नावे समोर येत आहेत. त्यात माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे पुत्र आणि कर्नाटकचे विद्यमान विरोधी पक्षनेते यतिंद्र सिद्धरामय्या यांनी आपले मत मांडले आहे. माझे वडील मुख्यमंत्री व्हायला हवेत, असे यतिंद्र यांनी म्हटले आहे.
सकाळी साडे नऊपर्यंत हाती आलेल्या कलांनुसार कर्नाटकात काँग्रेस 74 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप 45 आणि जनता दल सेक्युलर पक्ष 6 जागांवर आघाडीवर आहे.
कर्नाटक निवडणुकीच्या मैदानात यावेळी कॉंग्रेस पूर्ण तयारीने उतरले आहे. राहुल गांधींना यावेळी विजयी होण्याचा पूर्ण विश्वास आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी एक व्हिडिओ शेयर केला आहे.
कर्नाटकात विधानसभा निवडणुकीचे निकाल येत आहेत, तर काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी नुकत्याच शिमल्यातील हनुमान मंदिरात पोहोचल्या आहेत. तिथे त्यांनी पूजा केली.
विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांना आज बेंगळुरूला पोहोचण्यास सांगितले आहे; काँग्रेस 25 जागांवर आघाडीवर आहे
बीजेपी- 104
कांग्रेस- 104
जेडीएस- 16
सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. प्रत्येक क्षणाला चित्र बदलत आहे. पहिल्या ट्रेंडमध्ये काँग्रेसला बहुमत मिळाले असले तरी आता काँग्रेसचा आकडा खाली आला आहे.
कर्नाटकातील निवडणुकीचे ट्रेंडचे चित्र पुन्हा बदलले आहे. आता भाजपने ट्रेंडमध्ये शतक ठोकले आहे.
कर्नाटकातील सर्व 224 विधानसभा जागांसाठी प्रारंभिक कल समोर आला आहे. ट्रेंडमध्ये काँग्रेसला बहुमत मिळाले आहे. काँग्रेस 113 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप 80 जागांवर पुढे आहे.
कर्नाटकातील 224 विधानसभा जागांपैकी सुमारे 200 जागांसाठी कल आलेला आहे. काँग्रेसने 100 चा टप्पा ओलांडला आहे. यामध्ये भाजप खूपच मागे आहे. JDS 12 जागांवर तर इतर 5 जागांवर आहेत.
मतमोजणी सुरू होताच , मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी हुबली येथील हनुमान मंदिराला भेट दिली
भाजप ६०
काँग्रेस ६०
जेडीएस १०
इतर ५
भाजप ३२
काँग्रेस ३२
जेडीएस ०७
इतर ४
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आघाडीवर आहे.
पहिला कौल हा भाजपाच्या बाजूने आला आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई पुढे आहेत.
भाजप ६
काँग्रेस ६
जेडीएस oo
काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळेल आणि कर्नाटकात सरकार स्थापन होईल. आम्हाला विश्वास आहे की आम्ही स्वबळावर सरकार बनवू: यतिंद्र सिद्धरामय्या, काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे पुत्र
कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठी होणाऱ्या मतमोजणीपूर्वी दिल्लीतील काँग्रेस कार्यालयात जल्लोष सुरू आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीपूर्वी बेंगळुरूच्या माउंट कार्मेल कॉलेजमध्ये सुरक्षित स्ट्रॉंग रूम सुरू करण्यात आली आहे.
10 मे रोजी झालेल्या कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठी होणाऱ्या मतमोजणीपूर्वी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. बेंगळुरूमधील माउंट कार्मेल कॉलेज आणि सेंट जोसेफ कॉलेजच्या मतमोजणी केंद्रांवर पोलिस तैनात
आज विधानसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हुबळी येथील निवासस्थानाबाहेर सुरक्षा व्यवस्था
गुलबर्गा युनिव्हर्सिटी कॅम्पस, कलबुर्गी येथे उभारण्यात आलेल्या मतमोजणी केंद्रावर पोलिस बंदोबस्त, नऊ मतदारसंघातील मतमोजणी येथे होणार आहे.
राज्यभरातील 36 केंद्रांवर सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. कर्नाटकातील 224 जागांसाठी 10 मे रोजी निवडणूक पार पडली आहे. कर्नाटकातील निवडणुकीसाठी 72.67 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान, आता राज्यातील जनता सत्तेच्या चाव्या कुणाकडं देणार हे आज ठरणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी एकूण 2,615 उमेदवार उभे आहेत. त्यामध्ये 2,430 पुरुष तर 184 महिला उमेदवार आणि एक तृतीयपंथीय उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.