Chief Minister B. S. Yeddyurappa Dainik Gomantak
देश

Karnataka: मी मुख्यमंत्री पद सोडतो पण...

यातच आता कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा (Chief Minister B. S. Yeddyurappa) यांची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची धोक्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

कर्नाटकात (Karnataka) राजकिय समीकरणे वेगाने बदलू आहेत. यातच आता कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा (Chief Minister B. S. Yeddyurappa) यांची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची धोक्यात आली आहे. मागील वर्षाभरापासून कर्नाटक भाजप (BJP) अंतर्गत बंडाळीमुळे भाजपाने दुसऱ्या नेत्याला नेतृत्व देण्याचा निर्णय पक्का केला असल्याचे दिसत आहे. कॉंग्रेस- जदयूला सत्तेपासून परावृत्त करत येडीयुरप्पा यांनी कर्नाटकात भाजपची सत्ता पुन्हा एकदा स्थापन केली होती. मात्र त्यांची एकाधिकाराशाही भाजपच्या अन्य बड्या नेत्यांना रुचली नसल्याने काही काळातच त्यांच्याविरोधात उघडपणे नाराजी व्यक्त होऊ लागली होती.

मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांच्या तीन अटी-

येडीयुरप्पा यांनी लिंगायत समाजाच्या नेत्यांची नावे सुचवली आहेत. यासाठी दिल्लीतील नेतृत्वासमोर तीन अटी ठेवल्या आहेत. येडी यांनी खासदार असलेला मोठा मुलगा बी. एस. राघवेंद्र (B. s. Raghavendra) याला केंद्र सरकारमध्ये मंत्रीपद, दुसरा मुलगा भाजप उपाध्यक्ष बी. एस विजेंद्र (B. S. Vijendra) यास राज्यातील मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपद आणि मी सांगेन तोच कर्नाटकचा मुख्यमंत्री अशा एकाधिकारशाहीचं दर्शन घडवणाऱ्या तीन अटी ठेवल्या आहेत. दिल्लीतील भाजप नेतृत्वाने मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांना दिल्लीला येण्यासाठी सांगितले होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah) यांच्याशी चर्चा केल्यानंतर आपली मुख्यमंत्री पदाची खुर्ची धोक्यात नसल्याचे वक्तव्य येडीयुरप्पा यांनी केले आहे. तर दुसरीकडे भाजपामध्ये मुख्यमंत्री बदलाच्या हालचालींना वेग आला आहे. राज्यात लिंगायत समाजाचा दबदबा असल्याने त्याच समाजाचा मुख्यमंत्री होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

2012 मध्ये बी. एस. येडीयुरप्पा यांनी भाजपला रामराम करत नव्या पक्षाची स्थापना केली होती. त्यातच कर्नाटक विधानसभा निवडणूकीमध्ये त्यांनी स्थापन केलेल्या केजेपी पक्षाला एकूण 9.8 टक्के मते मिळाली होती. त्याचबरोबर सहा आमदारही निवडूण आले होते. त्यामध्ये भाजपला मोठी झळ बसली होती. यानंतर येडींनी भाजपमध्ये पुन्हा प्रवेश करत लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यात ते लोकसभा निवडणूकही जिंकले आणि त्यांना पुन्हा राज्यात पाठवून राज्याचे नेतृत्व करण्याची संधी दिली. येडीयुरप्पा यांनी जदयू- कॉंग्रेसला सत्तेपासून दूर केल्यानंतर त्यांचे पुत्र बी. एस. विजेंद्र यांचा सरकारमध्ये हस्तक्षेप वाढत गेला. यामुळे राज्यातील बड्या भाजप नेत्यांनी उघडपणे आपली नाराजी वयक्त करण्यास सुरुवात केली होती. ही नाराजी एवढी वाढली की, नेत्यांनी बंड करण्यापर्यंत पोहोचली. यामुळे कर्नाटकसारखे मोठे राज्य भाजपच्या हातून जाऊ नये यासाठी आता मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना उधान आले.

कोण होणार नवा मुख्यमंत्री-

मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी राजीनामा दिल्यानंतर कोणाकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा जाणार याच्या सुरु झाल्या आहेत. यामुळे राज्यातील बड्या नेत्यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. राज्यातील 2023 विधानसभा निवडणूका होणार आहेत. त्यामुळे केंद्रामध्ये मुख्यमंत्री असलेले प्रल्हाद जोशी (Pralhad Joshi) खाणमंत्री मुरगेश निरानी, गृहमंत्री बकवराज बोम्मई, राज्याचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी तसेच राष्ट्रीय संघटनमंत्री बी. एल. संतोष आणि माजी मंत्री बसवनगौडा पाटील यतनाळ यांची नावे मुख्यमंत्री पदाच्या चर्चेत आहेत. येडीयुरप्पा यांना मुख्यमंत्री पदावरुन हटवण्याचा पहिल्यांदा घाट यतनाळ यांनी घातला होता. आता यतनाळ यांची ही मागणी पूर्ण होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs NZ: 'किंग' कोहलीची ऐतिहासिक 'विराट' ओव्हरटेकिंग; मैदानात पाऊल ठेवताच मोडला सौरभ गांगुलीचा मोठा रेकॉर्ड

"आम्ही आणि पाकिस्तानी सैन्य एकच!" लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवादी सैफुल्लाह कसूरीची मोठी कबुली; भारताविरुद्ध पुन्हा ओकली गरळ

"...म्हणून गोवा बर्बाद" राज ठाकरेंनी मांडलं जमिनींच्या लुटीचं 'डिजिटल' गणित; महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत रील्सस्टार्सना लगावला टोला

Goa Tourism: गोव्याचा पर्यटनात जागतिक डंका! 2025 मध्ये 1 कोटी 8 लाख पर्यटकांनी दिली भेट

IND vs NZ: ऋषभ पंतच्या जागी 'या' युवा खेळाडूची संघात एन्ट्री, 'BCCI'ने केली घोषणा

SCROLL FOR NEXT