Karnataka government to build Kannada Bhavan in Goa Dainik Gomantak
देश

कर्नाटक सरकारची मोठी घोषणा! गोव्यात उभारणार कन्नड भवन

गोव्यात 'कन्नड भवन' बांधण्यासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची 10 कोटींची घोषणा केली

दैनिक गोमन्तक

कर्नाटक : गोव्यात सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहे. आणि अशातच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी गोव्यात कन्नड भवन उभारण्यासाठी ₹ 10 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे. गोव्यातील अखिल गोवा कन्नड महासंघाच्या शिष्टमंडळाने कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांची त्यांच्या बंगळूरमधील ‘कृष्णा’ निवासस्थानी भेट घेतली.

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि आमदार सी. टी. रवी यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने आपल्या मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. उत्तर कर्नाटकमधील नागरिक मोठ्या प्रमाणावर गोव्यात स्थायिक झाले आहेत. जे गोव्यात कन्नड भाषा आणि संस्कृतीचे संवर्धन करत आहेत, कन्नड लोकांच्या हितासाठी गोव्यात कन्नड भवन बांधण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. असेही त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतांना निदर्शनास आणून दिले.

मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, बोम्मई यांनी गोव्यातील कन्नड भवनाच्या बांधकामासाठी जमीन शोधण्याचा अहवाल आणि त्याची तपशीलवार माहिती तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. अखिल गोवा कन्नड महासंघाचे अध्यक्ष सिद्धन्ना मेटी आणि इतर पदाधिकाऱ्यांनीही मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेचे कौतुक केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: गोवा सरकार गाढ झोपेत, तर गृहमंत्री त्यांच्या राजकीय अजेंड्यात

Goa Contract Professors: कंत्राटी प्राध्यापकांची होणार चांदी, 'समान वेतन-समान काम' सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट

Goa Crime: गोवा फॉरवर्ड पक्ष युथ विंगच्या उपाध्यक्षावर जीवघेणा हल्ला; कारही फोडली

Julus in Goa: मडगावात ईद ए मिलाद उत्साहात साजरा

Donald Trump: आम्ही रशियासह भारतालाही गमावले! राजनैतिक संबंध विकोपाला गेल्याची ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT