लोबोंनी दिले भाजपला खुले आव्हान

विरोधकांची रणनीती पुढील आठवड्यात मोठ्या उलाढालीचे संकेत
Goa Politics पर्यावरण मंत्री मायकल लोबो
Goa Politics पर्यावरण मंत्री मायकल लोबोDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी (Panjim) : विधानसभा निवडणुकीच्या (Goa Assembly Election) तोंडावर भाजपला (BJP) अडचणीत‌ आणणारी रणनीती स्पष्ट होऊ लागली आहे. अपक्ष आमदार‌ रोहन खंवटे यांच्या समर्थकांच्या कॉंग्रेस (Congress) प्रवेशाने खंवटे यांचाही पुढचा डाव उघड झालेला असतानाच मंत्री मायकल लोबो यांनी आपली पत्नी शिवोलीतून, तर कॉंग्रेसमध्ये असलेले सुधीर कांदोळकर हेही आपले उमेदवार म्हणून रिंगणात उतरतील, (Goa Politics) असे जाहीर करीत भाजपला अडचणीत आणले आहे.

Goa Politics पर्यावरण मंत्री मायकल लोबो
गोव्‍यातील व्‍यावसायिकांचे ‘अच्छेदिन’ सुरू

बार्देशात पुढील आठवड्यात मोठ्या उलाढाली होण्याचे संकेत आज मंत्री मायकल लोबो यांनी काणका येथील जाहीर सभेत दिले. येत्या 15 नोव्हेंबरनंतर भाजपमधील अस्वस्थ असलेले काही आमदारही काँग्रेसच्या कळपात जाणार असल्याची जोरदार चर्चा बार्देशात सुरू आहे. मायकल लोबो यांनी आपली पत्नी डिलायला लोबो या शिवोलीतून निवडणूक लढवणार असल्याने काणका येथे जाहीर सभेत अप्रत्यक्षपणे सांगताना आगामी विधानसभेत ते व त्यांच्या पत्नी तसेच काँग्रेसचे सुधीर कांदोळकर हे आमदार असतील, असा दावा केला आहे. काही आमदारांनी भाजपला सोडचिठ्ठी देण्याची तयारी केली असल्याची चर्चा आहे. या आमदारांनी काँग्रेसच्या केंद्रातील नेत्यांशी संपर्क साधला आहे. अजूनही त्यांना ठोस आश्‍वासन मिळाले नसल्याने निर्णय घेण्यास थोडा विलंब होत आहे.

Goa Politics पर्यावरण मंत्री मायकल लोबो
म्हादई नदीत पोहायला गेलेल्या तिघा भावंडांपैकी एकाचा बुडून मृत्यू

दरम्यान, काँग्रेस भवनात झालेल्या कार्यक्रमावेळी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, वरद म्हार्दोळकर उपस्थित होते. पर्वरीचे आमदार खंवटे यांचे समर्थक असलेल्या तीनवेळा जिल्हा पंचायत सदस्य असलेले गुपेश नाईक, मरिना मोराईश, आग्नेल परेरा, हेमंत बोरकर, श्यामसुंदर कामत, सुभाष हळर्णकर, नारायण नाईक, किशोर सावंत, कोनी पिंटो, इ्स्ताक शेख, दिनेश नाईक, किशोर सावंत, वेरोनिका डिसिल्वा, दीपराज नाईक, सिद्धेश नाईक, रियाझ शेख, एलरिक डिसोझा व दीपक विर्नोडकर यांचा समावेश आहे.

खंवटे म्हणतात, भाजपविरुद्ध एकत्र या...

विरोधकांचे लक्ष्य भाजपला सत्तेवरून हटवण्याचे असल्याने त्यासाठी सर्वांनी एकत्र आल्याशिवाय ते शक्य नाही. गोव्याचे अस्तित्व टिकवण्यासाठी व लोकांना त्यांच्या पसंतीचे सरकार देण्यासाठी एकजुटीने लढा भाजपविरोधात द्यायला हवा असे मत आमदार रोहन खंवटे यांनी त्यांच्या पर्वरी समर्थकांनी काँग्रेस प्रवेश केल्यानंतर व्यक्त केले. आमदार खंवटे यांनी आपल्या समर्थकांना काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा सल्ला देऊन स्वतःही येत्या काही काळात प्रवेश करणार याचे संकेत दिले आहेत.

Goa Politics पर्यावरण मंत्री मायकल लोबो
शासकीय कामकाजातून ‘विधवा’ शब्द काढा

पर्यायी व्यवस्थेच्या हालचाली

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आगामी निवडणुकीसाठी जिंकण्याची क्षमता असलेल्या आमदारांनाच यावेळी उमेदवारी मिळेल तसेच अर्ध्यापेक्षा अधिक विद्यमान आमदारांना उमेदवारी मिळणार नाही, असे उघड केल्याने काहींनी पर्यायी व्यवस्था करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. काँग्रेसच्या काही फुटिरांना भाजपमध्ये जाऊन मनःस्ताप झाला आहे. सध्या ‘न घर का ना घाट का’ अशी त्यांची स्थिती झाली आहे. काँग्रेसमध्ये पुन्हा स्थान मिळवण्यासाठी त्यांची घोडदौड सुरू असली तरी त्यात त्यांना यश मिळत नाही.

भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस

भाजपमध्येही उमेदवारीवरून चढाओढ व उमेदवारीवर दावे करण्यास सुरवात केली आहे. उमेदवारी घोषित होण्याअगोदरच काहींनी प्रचाराचा नारळ फोडला आहे. त्यामुळे भाजपमध्येही अंतर्गत धुसफूस सुरू असली तरी सर्व काही आलबेल असल्याचे दाखविले जात आहे. काँग्रेस हा जुना तसेच राष्ट्रीय पक्ष आहे. भाजपला आगामी निवडणुकीत पराभूत करायचे असल्यास या पक्षानेच पुढाकार घेण्याची गरज आहे. विरोधकांनी उमेदवार उभे करून मतांची विभागणी झाली तर त्याचा फायदा भाजपलाच होणार आहे.

खंवटे बंधूही इच्छुक : रोहन खंवटे यांचे बंधू राजेश खंवटे हेसुद्धा सांताक्रुझ मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे त्यांना काँग्रेस उमेदवारी देण्याच्या अटीवर हा सौदा झाला आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे. भाजप सरकारमधील मंत्रिपदावरून हटविल्यानंतर आमदार रोहन खंवटे हे काँग्रेसवासी होणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, त्यांनी प्रवेश न करता काँग्रेसबरोबर राहिले. विधानसभेतही त्यांनी विरोधकांच्या बाजूने किल्ला लढविला.

आगामी निवडणुकीत बार्देशमधील 7 पैकी 6 आमदार हे आपले असतील, मात्र निवडणुकीत पक्ष कोणता असेल हे आताच्या घडीस सांगू शकत नाही.

- मायकल लोबो, मंत्री, कळंगुट

या निवडणुकीत भाजपविरोधी राजकीय पक्षांनी एकत्रित एकाच व्यासपीठावर येण्याची गरज आहे व भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याची गरज आहे. मी लवकरच निर्णय घेणार तो गोव्याच्या हिताचा असेल.

- रोहन खंवटे, अपक्ष आमदार

आमदार खंवटे यांच्या समर्थकांनी काँग्रेस प्रवेश केल्यामुळे काँग्रेसचे पर्वरीतील स्थान मजबूत झाले आहे. भाजपच्या काही कार्यकर्तेही काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक आहेत.

- गिरीश चोडणकर

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com