Crime  Dainik Gomantak
देश

Karnataka: शिक्षक बनला हैवान, चौथीत शिकणाऱ्या मुलाला मारहाण करुन छतावरुन दिले फेकून !

Crime News: शिक्षकाने इयत्ता चौथीत शिकणाऱ्या मुलाला मारहाण करुन छतावरुन खाली फेकले, त्यानंतर मुलाचा मृत्यू झाला. आरोपी शिक्षक शाळेत कॉन्ट्रॅक्टवर शिकवायचा.

दैनिक गोमन्तक

Karnataka Crime: कर्नाटकात शिक्षकाची क्रूरता समोर आली आहे. इथे गदग जिल्ह्यातील हॅडलिन गावात असलेल्या एका सरकारी शाळेतील शिक्षकाने इयत्ता चौथीत शिकणाऱ्या मुलाला मारहाण करुन छतावरुन खाली फेकले, त्यानंतर मुलाचा मृत्यू झाला. आरोपी शिक्षक शाळेत कॉन्ट्रॅक्टवर शिकवायचा.

वास्तविक, उच्च प्राथमिक शाळेतील कंत्राटी शिक्षक मुथप्पा यांनी इयत्ता चौथीत शिकणाऱ्या भरत या विद्यार्थ्याला वर्गाबाहेर ओढून बेदम मारहाण केली. यानंतर त्याला शाळेच्या पहिल्या मजल्यावरुन खाली ढकलण्यात आले. यातच त्याचा मृत्यू झाला.

आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे भरतची आईही याच शाळेत शिक्षिका असून त्यांचे नाव गीता असे आहे. त्याही या शाळेत कॉन्ट्रॅक्टवर शिवकतात. जेव्हा शिक्षक (Teacher) मुथप्पा यांनी मुलाला मारहाण करण्यास सुरुवात केली, तेव्हा भरतची आई गीता तिथे पोहोचल्या आणि आपल्या मुलाला मुथप्पापासून वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु मुथप्पाने त्यांच्यावरही हल्ला केला.

आई त्याला वाचवण्यासाठी गेली असता तिलाही मारहाण करण्यात आली

मुथप्पाने गीता यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला, त्याही रक्तबंबाळ झाल्या. जखमी होताच मुथप्पाने मुलाला पहिल्या मजल्यावरील टेरेसच्या काठावर नेले आणि खाली फेकले. यानंतर तात्काळ आई गीता आणि मुलगा भरत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र भरतचा मृत्यू झाला. त्याचवेळी गीता यांच्यावर KIMS हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

इथे, हल्ल्यानंतर आरोपी मुथप्पा शाळेतून फरार झाला. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून फरार मुथप्पाच्या शोधासाठी शोधमोहीम सुरु केली आहे. मुथप्पाने भरतला का मारले याचे कारण समोर आलेले नाही. पोलीस (Police) तपासात गुंतले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT