Karnataka Election 2023 Exit Poll:
Karnataka Election 2023 Exit Poll: Dainik Gomantak
देश

Karnataka Election 2023 Exit Poll: कर्नाटकात 'कमळ' कोमेजणार; काँग्रेस पुन्हा मारणार मुसंडी; जाणून घ्या सर्व एक्झिट पोलचे निष्कर्ष...

Akshay Nirmale

Karnataka Election 2023 Exit Poll: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत राज्यातील 224 जागांसाठी मतदान पार पडले आहे. त्यानंतर एक्झिट पोलदेखील समोर आले आहेत. त्यातून राज्यात भाजपचे कमळ कोमेजणार असल्याचे समोर येत आहे. तर काँग्रेस पुन्हा मुसंडी मारणार असल्याचे दिसत असून जनता दल सेक्युलर पक्षाच्या सहाय्याने काँग्रेस पक्ष कर्नाटकात सत्ता स्थापन करू शकतो.

कर्नाटकात बहुमताचा आकडा 112 इतका आहे. काँग्रेसला आघाडी करून ही मॅजिक फिगर गाठणे अवघड ठरेल, असे सध्या तरी दिसत नाही. तथापि, भाजपकडून 'ऑपरेशन कमळ' राबविले गेल्यास, काहीही घडू शकते, अशीही चर्चा आहे.

आज तक आणि अॅक्सिस माय इंडिया

या एक्झिट पोलमध्ये बंगळुरू भागात काँग्रेसला मोठा फायदा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. येथील 28 जागांपैकी 17 जागा काँग्रेसला मिळू शकतात. तर भाजपला येथे केवळ 10 जागा मिळण्याची शक्यता आहे.

टाईम्स नाऊ ईटीजी

टाइम्स नाऊ ईटीजीने एक्झिट पोलमध्ये भाजपला 78 ते 92 तर काँग्रेसला 106 ते 120 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. जेडीएसला 20-26 जागा मिळण्याची शक्यता दर्शवली आहे. दोन ते चार जागा इतरांच्या खात्यात जाऊ शकतात.

न्यूज नेशन आणि सीजीएम

या एक्झिट पोलनुसार कर्नाटकमध्ये भाजपला 114 जागा मिळतील, तर काँग्रेसला 86 जागा मिळण्याची शक्यता आहे. जेडीएसला 21 जागा मिळू शकतात. यासह इतरांच्या खात्यात तीन जागा जाऊ शकतात.

TV9 कन्नड सी-व्होटर

TV9 कन्नड सी-व्होटरने एक्झिट पोलमध्ये भाजपला 83 ते 95 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. तर काँग्रेसला 100 ते 112 जागा मिळू शकतात. या एक्झिट पोलमध्ये जेडीएसला 21-29 जागा मिळण्याची शक्यता दर्शवली आहे. दोन ते सहा जागा इतरांच्या खात्यात जाऊ शकतात.

एशियानेट जन की बात

या एक्झिट पोलमध्ये कर्नाटकात भाजपला आघाडी मिळण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्यात भाजपला 94 ते 117 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर काँग्रेसला 91 ते 106 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर जेडीएसला 14-24 जागा मिळण्याची शक्यता आहे. दोन जागा इतरांच्या खात्यात जाऊ शकतात.

रिपब्लिक आणि पी मार्क

रिपब्लिक आणि पी मार्केच्या एक्झिट पोलनुसार कर्नाटकात भाजपला 85 ते 100 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर काँग्रेसला 94 ते 108 जागा मिळू शकतात. जेडीएसला 24-33 जागा मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे दोन ते सहा जागा इतरांच्या खात्यात जाऊ शकतात.

TV9 भारतवर्ष आणि पोलस्ट्रॅट

TV9 भारतवर्ष आणि पोलस्ट्रॅट एक्झिट पोलमध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजप पिछाडीवर राहिल असे दिसते. यामध्ये काँग्रेसला 99 ते 109, भाजपला 88 ते 98, जेडीएसला 21-26 जागा मिळतील, असे म्हटले आहे. इतरांना 0-4 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

ZEE NEWS आणि MATRIZE

या एक्झिट पोलनुसार, कर्नाटकात काँग्रेसला 103-118 जागा मिळतील तर भाजपला 79-94 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर जेडीएसला 25-33 जागा मिळण्याची शक्यता आहे. दोन ते पाच जागा इतरांच्या खात्यात जाऊ शकतात.

65.69 टक्के मतदान

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 224 जागांसाठी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 65.69 टक्‍के मतदान झाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bodgeshwar Temple Theft: बोडगेश्वर मंदिरात चोरी करणारी टोळी जेरबंद; चौघांना सावंतवाडीतून अटक

UEN For Goa Students: गोव्यात बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार पर्मनंट एज्यूकेशन नंबर, कसा होणार फायदा?

‘या’ देशाच्या माजी मंत्र्याच्या पत्नीची निर्घृण हत्या, खळबळजनक खुलासा; व्हिडिओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Loksabha Election 2024 : एनडीए आघाडीला २०० पार होणेही मुश्कील : डॉ. शशी थरूर

Supreme Court: राष्ट्रीय ग्राहक आयोगाच्या सदस्यांना कोर्टाने फटकारले; आदेशाच्या उल्लंघनबाबत बजावली अवमानाची नोटीस

SCROLL FOR NEXT