CM Basavaraj Bommai Dainik Gomantak
देश

Karnataka मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, मुस्लिमांचे ओबीसी आरक्षण रद्द; EWS कोट्यात मिळणार...

CM Basavaraj Bommai: कर्नाटक मंत्रिमंडळाने शुक्रवारी मुस्लिमांसाठीचे 4 टक्के ओबीसी आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला. मुस्लिमांसाठीचे आरक्षण 10 टक्के EWS कोट्यात ठेवले जाईल.

Manish Jadhav

CM Basavaraj Bommai: कर्नाटक मंत्रिमंडळाने शुक्रवारी मुस्लिमांसाठीचे 4 टक्के ओबीसी आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला.

मुस्लिमांसाठीचे आरक्षण 10 टक्के EWS कोट्यात ठेवले जाईल. खरे तर, भाजप ओबीसी कोट्यातील मुस्लिमांसाठीचे 4 टक्के आरक्षण संपुष्टात आणणार असल्याच्या बातम्या आधीच आल्या होत्या.

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीत अशा निर्णयामुळे चांगले मताधिक्य मिळेल, असे पक्षाच्या नेत्यांना वाटते. त्यामुळे हिंदू मतांचे ध्रुवीकरणही होईल, असे पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे.

दुसरीकडे, मुस्लीम (Muslim) समाजाच्या नेत्यांनी यावर भडक प्रतिक्रिया व्यक्त देत सरकारवर निशाणा साधला. परंतु शुक्रवारी कर्नाटक सरकारने ओबीसी कोट्यातील 4 टक्के आरक्षण रद्द केले.

तसेच, कर्नाटकातील पंचमसाली लिंगायत, कुरुबा आणि इतर समुदायांनी विविध प्रवर्गांतर्गत आरक्षणाचा दावा करत आंदोलने सुरु केली.

मुस्लिम आणि ख्रिश्चनांना दिलेले आरक्षण मागे घेऊन हिंदू इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) आरक्षण द्यावे, असे भाजपच्या (BJP) काही आमदारांचे मत होते. त्यांचा युक्तिवाद असा होता की, संविधानात जातीवर आधारित आरक्षणाची तरतूद आहे, मात्र धर्मावर आधारित आरक्षणाची तरतूद नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway वर भीषण अपघात! भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं, दोघींचीही प्रकृती गंभीर Watch Video

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

Terrorist Secret Communication: गुप्त संवादासाठी अश्लील संकेतस्थळांचा वापर, दहशतवाद्यांची नवीन कार्यपद्धती; सोशल मीडियाला शोधला नवीन पर्याय

SCROLL FOR NEXT