बी. एस. येडीयुरप्पा (B. S. Yeddyurappa) यांनी कर्नाटकच्या (Karnataka) मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांची जागा भाजपमधील जेष्ठ नेते बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी घेतली. मुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीमधून मुक्त झाल्यानंतर येडीयुरप्पा आता जनतेचा आशिर्वाद घेण्यासाठी राज्यभर दैारा करणार आहेत. मात्र त्यांचा हा दौरा एकला चलो रे असून, त्यांच्याबरोबर कर्नाटक भाजपमधील (BJP) एकाही नेत्याची उपस्थिती असणार नाही. यामुळे कर्नाटकमधील राजकिय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघत आहे.
दरम्यान राज्यात 2023 मध्ये विधानसभा पार पडणार आहेत. या निवडणूका लक्षात घेऊन राज्यात वेगवेगळ्या दौऱ्यांचे आयोजन भाजपकडून करण्यात येत आहे. जनतेचा आशिर्वाद मिळविण्यासाठी त्याचबरोबर पक्षांतर्गत निर्माण झालेले मतभेद दूर करणे हा या दौऱ्यामगील हेतू आहे. याचवेळी माजी मुख्यमंत्री बीय एस. येडीयुरप्पा यांनी वेगळ्या दौऱ्याची घोषणा केल्यामुळे राज्यातील राजकिय वातावरण चांगलंच ढवळून निघू लागलं आहे. येडीयुरप्पा यांच्या दौऱ्यामध्ये एकाही स्थानिक भाजप नेत्यांचा समावेश असणार नाही. या दौऱ्यादरम्यान येडीयुरप्पा भाजप पदाधिकारी, राज्यातील स्थानिक भागामध्ये पक्षासाठी काम करणाऱ्या नेत्यांना भेटणार आहेत. मात्र भाजपकडून सांगण्यात येत आहे की, पक्षनेतृत्व आणि येडीयुरप्पा यांचा एकच उद्देश असून त्यांना आगामी विधानसभा निवडणूकीत राज्यात पुन्हा एकदा भाजपची सत्ता आणायची आहे.
शिवाय असे असले तरी, भाजप आणि येडीयुरप्पा यांचे मार्ग वेगवेगळे असल्याचे राजकिय तज्ञांकडून सांगण्यात येत आहे. यातून पुन्हा एकदा कर्नाटक भाजपमधील मतभेद चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. येडीयुरप्पांच्या या दौऱ्याची तारीख अद्याप मात्र जाहीर झालेली नाही. भाजपचे सरचिटणीस आणि राज्याचे प्रभारी अरुणसिंह सध्या राज्याचा दौरा करत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.