मुख्यमंत्रीपद सोडल्यापासुनच माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा (Yeddyurappa) पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होत्या. सोशल मिडीयावर या आशयाचे मेसेजसुद्धा व्हायरल होत होते. नुकत्याच पार पडलेल्या मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj bommai) यांच्या मंत्रीमंडळाचा विस्तारातील काही महत्वाच्या गोष्टींचा विचार करता येडीयुरप्पा यांना संपवण्याचा भाजपचा डाव असल्याच्या शक्यता देखील राजकीय वर्तुळात व्यक्त केल्या जात आहेत. यातच माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांचे पुत्र बी. वाय. विजयेंद्र यांचा मंत्रिमडळाध्ये समावेश करण्यात आलेला नाही. सरकारमध्ये येडीयुरप्पांनी महत्त्वाच्या नेमलेल्या सल्लागारांचीही नव्या मुख्यमंत्र्यांनी बसवराज बोम्मई यांनी उचलबांगडी केली आहे. त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांचा सरकारवरील प्रभाव कमी करण्यासाठी पक्षाकडून ही पावले उचलण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. याच पार्श्वभुमीवर येडीरयुप्पा हे देखील आता भाजपला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याच्या शक्यता व्यक्त झाल्या आहेत.
येडीयुरप्पा यांना संपवण्याचा भाजपचा डाव ?
कर्नाटकचे मुख्यमंत्री अतसाना येडीयुरप्पा यांनी सरकारमध्ये महत्वाच्या पदांवरती अनेक जवळच्या व्यक्तींची सल्लागार म्हणून नेमणूक केली होती. आता बसवराज बोम्मई यांनी मुख्यमंत्री पद स्वीकारताच येडीयुरप्पा यांनी नेमणूक केलेल्या सल्लागारांची उचलबांगडी केली आहे. 28 जुलैला बसवराज बोम्मई यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आठवड्याभरामध्येच त्यांनी सरकारमधील तब्बल 19 जणांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. याबाबतची अधिसूचना देखील मनुष्यबळ विभागाने 1 व 2 ऑगस्टला काढली आहे. येडीयुरप्पा यांचा आता सरकारमधील प्रभाव संपवून टाकण्यासाठी हे मोठे पाऊल उचलले असल्याचे सांगण्यात येत आहे. दिल्ली नेतृत्वाकडून बोम्मई यांनी मंत्रिमंडळाच्या यादी मंजूर करुन आणली आहे.
बसवराज बोम्मई शपथविधीच्या काही तास आगोदर माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. त्यांनी त्यांच्याबरोबर चर्चा केली. दरम्यान येडीयुरप्पा यांनी आपल्या मुलाला मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात यावे असा आग्रह धरला होता. मात्र त्यांच्या या मागणीला पक्ष नेतृत्वाने महत्त्व दिले नसल्याचे सांगण्यात येत आहे. बोम्मई यांनी स्वत:हा येडीयुरप्पा यांच्या पुत्राला मंत्रिमंडळामध्ये स्थान दिले नसल्याचे सांगितले होते. पक्षातील अनेक आमदारांनी येडीयुरप्पा मुख्यमंत्री असताना विजेयंद्र हे सुपरसीएम असल्याची टीका केली होती. या पाश्वभूमीवर विजेंद्रय यांना मंत्रिमंडळामधून वगळून पक्ष नेतृत्वाने मोठा धक्का दिला असल्याचे मानले जात आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर सुमारे एक आठवडा बसवराज बोम्मई यांनी बुधवारी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला आहे. या मंत्रींडळात 29 मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी राजभवनात नवीन मंत्र्यांना गोपनीयतेची शपथ दिली. विशेष म्हणजे या मंत्रींडळात उपमुख्यमंत्री करण्यात आलेला नाही.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.