DK Shivakumar  Dainik Gomantak
देश

Karnataka Assembly Election Results 2023: 'माझा दादा मुख्यमंत्री व्हावा...', डीके शिवकुमार यांच्या भावाचं मोठं वक्तव्य

Karnataka Assembly Election Results 2023: कर्नाटकात काँग्रेसने भाजपचा दारुण पराभव केला असून भाजपने आपला पराभव स्वीकारला आहे.

Manish Jadhav

Karnataka Assembly Election Results 2023: कर्नाटकात काँग्रेसने भाजपचा दारुण पराभव केला असून भाजपने आपला पराभव स्वीकारला आहे. 224 जागांपैकी काँग्रेस 135 जागांवर आघाडीवर असून भाजपचा डाव 64 जागांवर गुंडाळला असल्याचे दिसत आहे.

तर जेडीएसकडे 21 तर इतरांकडे 4 जागा आहेत. अशा स्थितीत कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष या विजयाचे हिरो म्हणून पुढे आले असून डीके शिवकुमार यांना पुढील मुख्यमंत्री बनवावे, अशी त्यांच्या समर्थकांची मागणी आहे.

डीके शिवकुमार काय म्हणाले?

कर्नाटकातील (Karnataka) विजयावर डीके शिवकुमार म्हणाले की, 'हा अखंड कर्नाटकचा विजय आहे. मुख्यमंत्री कोण होणार हे पक्ष ठरवेल.'

याशिवाय कर्नाटक काँग्रेसचे प्रमुख डीके शिवकुमार यांनी त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या आणि कर्नाटक निवडणुकीच्या ट्रेंडमध्ये काँग्रेसला बहुमत मिळाल्यानंतर व्हिक्ट्री चिन्ह दाखवले. यावेळी त्यांनी पक्षाचा झेंडाही फडकावला.

दरम्यान, विजयावर डीके शिवकुमार म्हणाले की, 'मी माझ्या कार्यकर्त्यांना आणि माझ्या पक्षाच्या नेत्यांना विजयाचे श्रेय देतो ज्यांनी खूप मेहनत केली. जनतेनं भाजप पराभव केला. मी राहुल गांधी, सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि प्रियंका गांधी यांना विजयाची खात्री दिली होती.'

डीके शिवकुमार यांचे भाऊ डीके सुरेश काय म्हणाले?

कर्नाटकात मुख्यमंत्रीपदासाठी चुरस सुर झाली आहे. दरम्यान, डीके शिवकुमार यांचे भाऊ डीके सुरेश यांचे वक्तव्य समोर आले आहे. डीके सुरेश म्हणाले की, माझा भाऊ मुख्यमंत्री व्हावा अशी माझी इच्छा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT