Karnataka Assembly Election 2023
Karnataka Assembly Election 2023 Dainik Gomantak
देश

Karnataka Assembly Election 2023: कर्नाटक निवडणुकीचा बिगुल; 'या' दिवशी मतदान, जाणून घ्या सविस्तर...

Akshay Nirmale

Karnataka Assembly Election 2023: गेल्या काही दिवसांपासून उत्सुकता लागून राहिलेल्या कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीची तारीख अखेर जाहीर झाली आहे. कर्नाटकात १० मे रोजी विधानसभेसाठी मतदान होणार आहे.

13 मे रोजी निकाल जाहीर होईल. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज, बुधवारी ही माहिती दिली.

कर्नाटकात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. कर्नाटकात एकूण 5.21 कोटी मतदार आहेत तर 224 विधानसभा मतदारसंघ आहेत. यावेळी भाजप, काँग्रेस आणि जेडीएस यांच्यातच लढत होणार आहे. मागच्या वेळी जेडीएस-काँग्रेस एकत्र होते, मात्र यावेळी जेडीएस वेगळे लढणार आहे.

राज्यातील विद्यमान भाजप सरकारचा कार्यकाळ २४ मे रोजी संपत आहे. यावेळी भाजप, काँग्रेस आणि जेडीएस यांच्यातच लढत होणार आहे. मागच्या वेळी जेडीएस-काँग्रेस एकत्र होते, मात्र यावेळी जेडीएस वेगळे लढणार आहे. 1 एप्रिल रोजी 18 वर्षे पूर्ण झालेल्या तरुणांनाही मतदान करता येणार आहे. त्यांची संख्या 41 हजार आहे.

कर्नाटकात विधानसभेच्या 224 जागा आहेत. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 104, काँग्रेसला 78 आणि जेडीएसला 37 जागा मिळाल्या होत्या.

कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही. येडियुरप्पा यांनी 17 मे रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि सभागृहात बहुमत सिद्ध करू न शकल्याने 23 मे रोजी राजीनामा दिला. त्यानंतर काँग्रेस-जेडीएस आघाडीचे सरकार स्थापन झाले.

14 महिन्यांनंतर कर्नाटकच्या राजकारणाला पुन्हा कलाटणी मिळाली. काँग्रेस आणि जेडीएसच्या काही आमदारांच्या बंडानंतर कुमारस्वामी यांना खुर्ची सोडावी लागली.

येडियुरप्पा यांनी या बंडखोरांना भाजपमध्ये विलीन केले आणि 26 जुलै 2019 रोजी 219 आमदारांच्या पाठिंब्याने येडियुरप्पा मुख्यमंत्री झाले, परंतु त्यांनी 2 वर्षानंतर राजीनामा दिला. त्यानंतर बसवराज बोम्मई मुख्यमंत्री झाले.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने 150 जागांचे लक्ष्य ठेवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 महिन्यांत 7 वेळा कर्नाटकचा दौरा केला आहे. तर काँग्रेसने 124 उमेदवार घोषित केले आहेत. आम आदमी पक्षानेही (आप) 80 उमेदवारांची घोषणा केली आहे.

दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, '२०२३ची निवडणूक ही माझी शेवटची निवडणूक असेल. दोन मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे.

दृष्टीक्षेपात

  • - कर्नाटकात 16,976 लोक 100 वर्षांपेक्षा जास्त वयाचे

  • - दिव्यांगांसाठी घरबसल्या मतदानाची सुविधा

  • - 9.17 लाख मतदार नवमतदार

  • - 58,282 मतदान केंद्रे आहेत. त्यापैकी 1320 महिला सांभाळतील.

4 राज्यांतील 5 विधानसभा जागांवर पोटनिवडणूक

कर्नाटकशिवाय पंजाब आणि यूपीसह 4 राज्यांतील 5 विधानसभा जागांवरही 10 मे रोजी पोटनिवडणूक होणार आहे. 13 मे रोजी निकाल लागणार आहे. पंजाबमधील जालंधर, ओडिशातील झारसुगुडा, उत्तर प्रदेशातील चंबे आणि स्वार, मेघालयातील सोहियोंग या जागांवर पोटनिवडणूक होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vegetable Prices Update: राज्यात फळभाज्यांचे दर भडकले, लसूण 320 रुपये किलो; सर्वसामान्यांना महागाईचे चटके

Blue Origin Flight: ऐतिहासिक! राकेश शर्मानंतर गोपीचंद थोटाकुरा ठरले अंतराळात जाणारे दुसरे भारतीय

Holy Spirit Feast In Margao: होली स्पिरिट चर्चच्या फेस्ताची सुरवात; मडगाव पालिकेचे 35 लाख महसुलाचे लक्ष्य

Egg Prices Increased: गोव्यात मासळीपाठोपाठ आता बॉयलर अंड्यांचे भाव गगनाला भिडले; दरातील चढउतार सुरूच

Kushavati River: केपेतील ‘कुशावती’चे पाणी प्रदूषित; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात!

SCROLL FOR NEXT