UPI Payment : UPI पेमेंट करणाऱ्यांना मोठा धक्का! युपीआय पेमेंटला मोजावे लागणार एवढे शुल्क

UPI पेमेंट करणाऱ्यांना मोठा झटका दिला असुन १ एप्रिल पासुन अशा व्यवहारांना PPI चार्जेस भरावे लागतील
UPI payment
UPI paymentDainik Gomantak
Published on
Updated on

UPI Payment: UPI पेमेंट करणाऱ्यांना मोठा झटका दिला आहे. बदलत्या काळानुसार, युनिफाइड पेमेंट इंटरफेस म्हणजेच UPI सामान्य लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. 

सध्या अनेक लोक प्रत्येक लहान आणि मोठ्या खरेदीसाठी UPI द्वारे पेमेंट करण्यास प्राधान्य देतात. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI), जे आता UPI चालवते, 24 मार्च 2023 रोजी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, UPI वरून व्यापारी व्यवहारांवर प्रीपेड पेमेंट प्रीपेड इन्स्ट्रुमेंट (PPI) शुल्क लागू केले जाईल. 

या अधिसूचनेनुसार, जर एखाद्या व्यक्तीने मोबाईल (Mobile) वॉलेटसारख्या प्रीपेड पेमेंट प्रीपेड इन्स्ट्रुमेंटद्वारे व्यापाऱ्यांना 2,000 रुपयांपेक्षा जास्त पैसे ट्रान्सफर केले तर अशा परिस्थितीत त्याला इंटरचेंज फी भरावी लागेल. 

इंटरचेंज फी किती असेल

एका प्रसिध्द अहवालानुसार एनपीसीआयच्या परिपत्रकात 2,000 रुपयांपेक्षा जास्त व्यवहारांवरच हे इंटरचेंज शुल्क आकारले जाईल. हे शुल्क साधारणपणे 2,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या 1.1 टक्के असेल. 

विशेष म्हणजे NPCI ने वेगवेगळ्या प्रदेशांसाठी वेगवेगळे इंटरचेंज शुल्क निश्चित केले आहे. कृषी आणि दूरसंचार क्षेत्रात सर्वात कमी इंटरचेंज फी आकारली जाईल. हे शुल्क केवळ व्यापारी व्यवहारांसाठी पेमेंट करणाऱ्या वापरकर्त्यांनाच द्यावे लागेल.

UPI payment
Krishi Ashirvaad Yojana: सन्मान निधीच्या लाभार्थ्यांसाठी खूशखबर, 6 हजार नाही तर आता खात्यात येणार एवढे रुपये, असा करा अर्ज
  • कोणाकडून किती शुल्क आकारले जाणार नाही

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन (NPCI) च्या परिपत्रकानुसार, बँक खाती (Bank Account) आणि PPI वॉलेटमधील पीअर-टू-पीअर (P2P) आणि पीअर-टू-पीअर-मर्चंट (P2PM) व्यवहारांवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

1 एप्रिलपासून हा नवीन नियम लागू केल्यानंतर, NPCI 30 सप्टेंबर 2023 पूर्वी त्याचे पुनरावलोकन करेल.  

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com