Kapil Sibal  Dainik Gomantak
देश

काँग्रेसची गळती थांबेना; कपिल सिब्बल यांचा पक्षाला रामराम

सपाच्या पाठिंब्याने लखनौमध्ये राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल

दैनिक गोमन्तक

काँग्रेस जनमानसात जात सामान्यांच्या अधिक जवळ जाणार असल्याचं पक्षश्रेष्टी सोनिया गांधी यांनी बोलून दाखवले असतानाच काँग्रेसमधील गळती थांबायला तयार नाही. कारण काही दिवसांपूर्वी पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुनील जाखड यांनी काँग्रेसला सोडले. याला काही दिवस होतात न होतात तोच गुजरातमध्ये काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांनी ही काँग्रेसला सोडचिट्टी दिली आहे. यातच आता पुन्हा भर पडली असून काँग्रेसमधील G-23 गटाचा प्रमुख चेहरा कपिल सिब्बल यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. (Kapil Sibal's goodbye to the Congress )

सिब्बल हे 4 जुलै रोजी राज्यसभेतून निवृत्त होणार आहेत. बुधवारी त्यांनी समाजवादी पक्षाच्या पाठिंब्याने लखनौमध्ये अपक्ष म्हणून राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. लखनौमध्ये सपा प्रमुख अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत उत्तर प्रदेशमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी दाखल करताच आपण काँग्रेसचा राजीनामा दिला होता असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

यावेळी बोलताना सिब्बल यांनी मी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. देशात स्वतंत्र आवाज असावा अशी माझी नेहमीच इच्छा आहे. विरोधी पक्षात राहून, आम्हाला युती करायची आहे. जेणेकरून आम्ही मोदी सरकारला विरोध करू शकू," असेही ते पुढे म्हणाले. यावेळी उत्तर प्रदेश विधानसभेत सपाचे १११ आमदार असल्याने सिब्बल यांची निवड वरिष्ट सभागृहात निवडून येण्याची शक्यता आहे. सिब्बल यांनी विविध मुद्द्यांवर काँग्रेस हायकमांडवर टीका केली होती आणि काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसह पक्षात व्यापक सुधारणांची मागणी केली होती.

कपिल सिबल हे राजकारणासोबत एक कायदेतज्ज्ञ देखील आहेत. अनेक महत्त्वाचे खटले त्यांनी सु्प्रीम कोर्टात लढवले आहेत. सिबल यांनी समाजवादी पक्षासह राष्ट्रीय जनता दल आणि झारखंड मुक्ती मोर्चा आदी पक्षांकडून ऑफर असल्याची चर्चा सुरू होती. या तिन्ही पक्षांच्या महत्त्वांच्या नेत्यांचे खटले सिबल यांच्याकडे आहेत.

राज्यसभेच्या 10 जागांसाठी काँग्रेसमध्ये इच्छुकांची रांग

देशभरात होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसला 10 जागांवर विजय मिळणार आहे. यामध्ये राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये प्रत्येकी दोन जागा, झारखंड, मध्य प्रदेश, हरयाणा, कर्नाटक, महाराष्ट्र आणि तामिळनाडूत प्रत्येकी एका जागेवर विजय मिळू शकतो. या 10 जागांसाठी काँग्रेसमधील अनेकजण इच्छुक आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT