Chhatrapati Shahuji Maharaj College Dainik Gomantak
देश

Uttar Pradesh News: 'हे' महाविद्यालय देणार कर्मकांडाचे शिक्षण, विद्यार्थ्यांना मिळणार 16 संस्कारांचे धडे

Uttar Pradesh News: भारतीय संस्कृतीकडे तरुणांचा वाढता कल पाहता कानपूरच्या छत्रपती शाहूजी महाराज महाविद्यालयाने एका मोठा निर्णय घेतला आहे.

Manish Jadhav

Uttar Pradesh News: भारतीय संस्कृतीकडे तरुणांचा वाढता कल पाहता कानपूरच्या छत्रपती शाहूजी महाराज महाविद्यालयाने एका मोठा निर्णय घेतला आहे. छत्रपती शाहूजी महाराज महाविद्यालयाने गुरुकुलाच्या धर्तीवर कर्मकांडमध्ये डिप्लोमा कोर्स सुरु केला आहे. या कोर्समध्ये प्रत्येक प्रकारच्या उपासना पद्धतीसोबतच विद्यार्थी कलशपूजा, गौ पूजनासह 16 संस्कारांचे विद्वान बनतील.

दरम्यान, महाविद्यालयाने (College) कर्मकांडात एक वर्षाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु केला आहे. यामध्ये विद्यार्थी ज्योतिषाचा डिप्लोमा करु शकतात. हा कोर्स सुरु केल्यानंतर विद्यार्थी कलश पूजन, श्लोक आणि संस्कारातही विद्वान होतील.

12वी पासही अर्ज करु शकणार आहेत

माध्यम प्रभारी डॉ. विशाल शर्मा यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना प्रथमच कर्मकांड या विषयावर प्रमाणपत्र आणि पदविका अभ्यासक्रम शिकता येणार आहेत. CSJM मध्ये 12वी पास विद्यार्थीही अर्ज करु शकतात.

कर्मकांड अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना (Student) 1 वर्षासाठी 5000 रुपये आणि 6 महिन्यांच्या अभ्यासक्रमासाठी 2500 रुपये द्यावे लागतील. एखाद्या विद्यार्थ्याला ज्योतिष शास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घ्यायचे असेल तर त्याला 7000 फी भरावी लागेल.

त्याचबरोबर भारतीय ज्ञान परंपरा आणि दीनदयाल अभ्यासासाठी 5000 रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांना धर्म आणि संस्कृतीशी जोडण्यासाठी अभ्यासक्रम सुरु करण्यात आला

विद्यार्थ्यांना धर्म आणि संस्कृतीशी जोडण्यासाठी छत्रपती शाहूजी महाराज महाविद्यालयाने हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. प्रत्येक अभ्यासक्रमासाठी 25-25 जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे.

हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना पुरोहिताचे प्रमाणपत्र मिळणार आहे. विशेष म्हणजे, सैन्यात धर्म शिक्षक या पदासाठी कर्मकांड डिप्लोमा अनिवार्य आहे. तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठीही महाविद्यालयाचा हा अभ्यासक्रम प्रभावी ठरणार आहे.

विद्यार्थ्यांना 16 संस्कारांचे अभ्यासक बनवले जाणार आहे

CSJM प्राध्यापक विद्यार्थ्यांना कलश पूजन, गौ पूजन आणि 16 संस्कारांचे विद्वान बनवतील. मिळालेल्या माहितीनुसार, कोणत्याही शाखेतील पदवीधर विद्यार्थी थेट प्रवेश घेऊ शकतात.

छत्रपती शाहूजी महाराज महाविद्यालय शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने नवनवीन बदल करत आहे, त्यासाठी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदी बेन पटेल यांनीही CSJMU चे कौतुक केले आहे.

माध्यम प्रभारी डॉ.विशाल शर्मा सांगतात की, हिंदी, संस्कृत, हिंदू अभ्यासानंतर कर्मकांड आणि ज्योतिषाची ओळख झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'सापांचा राजा'! जगातील सर्वात लांब विषारी सापाचा व्हिडिओ व्हायरल, एका हल्ल्यात घेऊ शकतो हत्तीचाही जीव

Weekly Health Horoscope: आरोग्याच्या दृष्टीने आव्हानात्मक आठवडा! 'या' 5 राशींनी निष्काळजीपणा टाळावा

Arjun Tendulkar: नको तेच झालं! साखरपुड्यानंतर सचिनच्या लेकाला मोठा धक्का, नेमकं प्रकरण काय? वाचा..

Curchorem Accident: कुडचडे पोलीस ठाण्यासमोर अपघात, एकाच वेळी तीन गाड्या आणि दुचाकीची धडक; एकजण जखमी

Rohit Sharma: ‘देशाला तुझी अजून 5 वर्षे गरज...’, रोहित शर्माच्या निवृत्तीवर भारतीय दिग्गजाचं मोठं वक्तव्य

SCROLL FOR NEXT