Kane Williamson Dainik Gomantak
देश

Kane Williamson Retirement: केन विल्यमसनचा T20 क्रिकेटला अलविदा, कसोटी क्रिकेटवर करणार लक्ष केंद्रीत; म्हणाला, "युवा खेळाडूंना संधी देण्याची हीच योग्य वेळ"

Kane Williamson Retirement T20 International: न्यूझीलंडचा अनुभवी आणि स्टार फलंदाज केन विल्यमसन याने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

Manish Jadhav

Kane Williamson Retirement: न्यूझीलंडचा अनुभवी आणि स्टार फलंदाज केन विल्यमसन याने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती (Retirement) जाहीर केली. क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटला अलविदा म्हणत त्याने आता आपले संपूर्ण लक्ष कसोटी क्रिकेटवर (Test Cricket) केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला. याच कारणामुळे तो वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी एकदिवसीय (ODI) मालिकेतूनही बाहेर राहणार आहे. विल्यमसनने आपला शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना 2024 मध्ये खेळला होता आणि गेल्या काही महिन्यांपासून या फॉरमॅटमध्ये त्याची कामगिरी अपेक्षेनुसार झाली नव्हती.

निवृत्ती घेण्याची 'योग्य वेळ'

आपल्या निवृत्तीच्या निर्णयाबद्दल बोलताना केन विल्यमसनने (Kane Williamson) सांगितले की, क्रिकेटच्या या सर्वात लहान फॉरमॅटमधून बाजूला होण्याची हीच योग्य वेळ आहे. आपल्या टी-20 कारकिर्दीतील आठवणी आणि अनुभवांसाठी त्याने कृतज्ञता व्यक्त केली. विल्यमसन म्हणाला की, न्यूझीलंडच्या टी-20 संघात सध्या अनेक युवा आणि प्रतिभावान खेळाडू आहेत आणि पुढील टप्पा या खेळाडूंना टी-20 विश्वचषकासाठी तयार करण्यासाठी महत्त्वाचा असेल. त्याने सध्याचे कर्णधार मिचेल सेंटनर यांचेही कौतुक केले, सेंटनर एक उत्कृष्ट कर्णधार असल्याचे आणि त्याने आपली नेतृत्वक्षमता सिद्ध केल्याचे विल्यमसनने नमूद केले.

विल्यमसनने स्पष्ट केले की, आता न्यूझीलंडच्या टी-20 संघाला पुढे घेऊन जाण्याची वेळ आली आहे आणि यापुढे तो दूर राहून या संघाला पाठिंबा देत राहील. "मला या संघाची खूप काळजी आहे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट तसेच या वातावरणात खेळायला मला खूप आवडते," असे भावनिक मतही त्याने व्यक्त केले. तो न्यूझीलंड क्रिकेट सोबतचा संवाद भविष्यातही कायम ठेवणार आहे.

T20I क्रिकेटमधील विल्यमसनची आकडेवारी

केन विल्यमसनने 2011 मध्ये न्यूझीलंडकडून टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि त्यानंतर तो संघाचा आधारस्तंभ बनला. त्याने आपल्या कारकिर्दीत एकूण 93 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले, ज्यात त्याने 2575 हून अधिक धावा केल्या. यात त्याच्या बॅटमधून 18 अर्धशतके निघाली, तर त्याचा सर्वोच्च स्कोअर 95 धावा इतका होता. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी, तो जगभरातील फ्रँचायझी क्रिकेट खेळणे मात्र सुरु ठेवणार आहे.

कर्णधार म्हणून विक्रमी कामगिरी

विल्यमसनने आपल्या उत्कृष्ट नेतृत्व आणि फलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंड संघाला अनेक अविस्मरणीय विजय मिळवून दिले. त्याने कीवी संघासाठी एकूण 75 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये नेतृत्व केले, ज्यात संघाने 39 सामने जिंकले. त्याच्या नेतृत्वाखालीच कीवी संघाने टी-20 विश्वचषक 2021 मध्ये अंतिम फेरी (Final) गाठली होती. तसेच 2016 आणि 2022 मध्ये संघाला उपांत्य फेरीपर्यंत (Semi-Final) पोहोचवले होते.

विल्यमसनच्या या निर्णयामुळे न्यूझीलंडच्या टी-20 संघात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे, पण त्याने कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रित केल्यामुळे या फॉरमॅटमध्ये त्याची कामगिरी आणखी उंचावण्याची आशा न्यूझीलंड (New Zealand) क्रिकेट चाहत्यांना आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'पक्षात यायचं तर दरवाजे उघडे आहेत', भाजप प्रदेशाध्यक्षांनी उडवली खिल्ली; काँग्रेसच्या रणनीतीला दिलं झणझणीत उत्तर

IND vs SA: कसोटी मालिकेत टीम इंडियाचा सूपडा साफ! व्हाईटवॉशनंतर गौतम गंभीरला म्हणाला, 'पराभवाची जबाबदारी सगळ्यांची...'

WTC Points Table: भारताच्या 'क्लिन स्वीप'चा पाकिस्तानला फायदा, WTC पॉइंट टेबलमध्ये उलटफेर; दक्षिण आफ्रिकेने मारली बाजी

रस्ते खोदाल तर याद राखा!! PM मोदींच्या दौऱ्यासाठी दक्षिण गोव्यात रस्ते खोदकामावर बंदी; नियमांचे उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल

Baina Dacoity: 6वा मजला, 6 दिवस, 6 आरोपी! 'गोवा पोलिसांनी करून दाखवलं'; बायणा दरोडा प्रकरणी पीडित कुटुंबाला मोठा दिलासा

SCROLL FOR NEXT