Sameer Amunekar
पाकिस्तान, आफ्रीका आणि न्यूझीलंड संघातील ट्राय सिरीजचा अंतिम सामना 14 फेब्रुवारी 2025 रोजी कराची येथे पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला गेला.
यात न्यूझीलंड क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज केन विल्यमसन फक्त 34 धावा करु शकला, मात्र असं असूनही, त्यानं एक विशेष कामगिरी केली आहे.
केन विल्यमसन या छोट्याशा खेळीसह तो वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 7000 धावा करणारा जगातील दुसरा फलंदाज बनला आहे.
विल्यमसनने टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याला मागे टाकलं आहे. कोहलीनं 161 डावांमध्ये वनडे सामन्यांमध्ये 7000 धावांचा टप्पा गाठला.
विल्यमसननं 159 डावांमध्येच 7000 धावांचा टप्पा गाठला आहे. या यादीत दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर हाशिम अमला याचं नाव पहिल्या क्रमांकावर येतं.
अमलानंतर केन विल्यमसन दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. एका स्थानानं घसरत विराट कोहली तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.