Jyoti Malhotra spy Video  Dainik Gomantak
देश

Jyoti Malhotra: ज्योतीने स्वतःच दिला हेरगिराचा पुरावा; 'ट्रॅव्हल विथ ज्यो'मधून पाकिस्तानी अधिकाऱ्यांसोबतचं गुपित उघड

Jyoti Malhotra spy case: ज्योती हिने स्वतः तिच्या एका व्हिडीओमधून पाकिस्तानसोबत असलेल्या कनेक्शनची माहिती दिली होती आणि आता हाच व्हिडीओ गुन्हा शाखेच्या हाती लागला आहे

Akshata Chhatre

Jyoti Malhotra latest update: पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारी भारतातील युट्युबर महिला ज्योती मल्होत्रा हिला अटक झाली आहे. तुम्हाला माहितीये का ज्योती हिने स्वतः तिच्या एका व्हिडीओमधून पाकिस्तानसोबत असलेल्या कनेक्शनची माहिती दिली होती आणि आता हाच व्हिडीओ गुन्हा शाखेच्या हाती लागला आहे. या व्हिडिओमध्ये नेमका कोणता पुरावा होता हे जाणून घेऊया.

व्हिडीओमधला पुरावा कोणता?

ज्योती मल्होत्रा ही व्हाट्सअप, टेलिग्राम, स्नॅपचॅट यांसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानमधील ऑपरेटिव्ह शाकीर उर्फ राणा शहाबाज याच्या संपर्कात होती. याच शाकीरचा नंबर तिने जट रंधावा म्हणून सेव्ह केला होता. ट्रॅव्हल विथ ज्यो या तिच्या चॅनेलवरून पाकिस्तानचे सकारात्मक चित्र निर्माण करण्याची जबाबदारी तिच्यावर सोपवण्यात आली होती.

सध्या व्हिडीओमध्ये ज्योती पाकिस्तानमधील उच्चअधिकारी रहमान उर रहीम आलियास दानिश याच्यासोबत दिसतेय. ज्योती हिच्याच व्हिडीओमधून ही माहिती मिळाली आहे.

तसेच ती रहीम यांच्या पत्नीला देखील भेटली असल्याची माहिती समोर आलीये. एवढंच नाही तर ज्योती आणि रहीम यांच्या अनेकदा भेटी गाठी झाल्या असण्याची शक्यता आहे.

पाकिस्ताला पुरवली लष्कराची माहिती

१७ मे २०२५ रोजी ज्योतीला अटक करण्यात आली आहे आणि तिच्यावर भारतीय लष्कराबद्दलची गुप्त माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप आहे. समोर आलेल्या माहितीनुसार २०२३ मध्ये तिला व्हिसा मिळाला होता आणि त्यानंतर तिने पाकिस्तान दौऱ्याच्यावेळी रहीमची भेट घेतली होती.

रहीम त्याकाळी उच्चयुक्तालयात अधिकारी होता. भारताबद्दल माहिती पुरवणे तसेच भारतात पाकिस्तान बद्दल सकारात्मकता पसरवण्यासाठी ज्योतीला पैसे दिले जात होते. सध्या आर्थिक गुन्हा शाखेकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: तब्बल दोन वर्षांनी होणार 'त्या' महिलेवर मडगावात अंत्यसंस्कार; पोलीस बंदोबस्तात अंतिम विधी, वाचा नेमकं प्रकरण काय?

IND vs AUS ODI: कांगारुंच्या भूमीवर 'हिटमॅन' किंग! कसा आहे ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा हेड-टू-हेड रेकॉर्ड? रोहित-विराट गाजवणार पर्थचं मैदान

PM Modi Srisailam Visit: आंध्रात शिवरायांसमोर पंतप्रधान मोदी नतमस्तक; श्रीशैलम येथे श्री शिवाजी ध्यान मंदिर अन् शिवाजी दरबार हॉलला दिली भेट पाहा Photo

अ‍ॅलन-रविरा गोव्यात विवाहबद्ध! 'दिया और बाती हम' फेम अभिनेत्याने गर्लफ्रेन्डसोबत बांधली लग्नगाठ; पाहा Photos

आंध्रप्रदेशात पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमस्थळी शॉक लागून 15 वर्षीय मुलाचा मृत्यू, पोलिसांकडून तपास सुरु

SCROLL FOR NEXT