Justice Thottathil B Radhakrishnan Passed Away Dainik Gomantak
देश

Justice Thottathil B Radhakrishnan Passed Away: उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश थोट्टाथिल 63 व्या वर्षी निधन

कोची येथील एका खासगी रुग्णालयात कर्करोगावर उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.

Puja Bonkile

Justice Thottathil B Radhakrishnan Passed Away: कलकत्ता, तेलंगणा, हैदराबाद आणि छत्तीसगड उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश आणि केरळ उच्च न्यायालयाचे न्यायाधीश थोट्टाथिल बी. राधाकृष्णन यांचे आज निधन झाले आहे. ते 63 वर्षांचे होते.

कोची येथील एका खासगी रुग्णालयात कर्करोगावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. केरळ उच्च न्यायालयात 12 वर्षांहून अधिक काळ कार्य केले होते. बी. राधाकृष्णन यांनी पहाटे 03.11 वाजता अखेरचा श्वास घेतला.

ते छत्तीसगड आणि तेलंगणा/आंध्र उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश होते आणि तेलंगणा उच्च न्यायालयाची स्थापना झाली तेव्हा ते पहिले मुख्य न्यायाधीश होते.

1983 मध्ये वकील म्हणून काम करण्यास सुरुवात करणारे बी. राधाकृष्णन 14 ऑक्टोबर 2004 रोजी केरळ उच्च न्यायालयात न्यायाधीश झाले.

ते दोन वेळा कार्यवाहक मुख्य न्यायाधीश होते आणि केरळ विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष होते. न्यायमूर्ती या नात्याने नागरी हक्क आणि मूलभूत सार्वजनिक समस्यांशी संबंधित मुद्द्यांमध्ये त्यांचा थेट सहभाग होता.

राज्यातील मानसिक आरोग्य केंद्रांच्या कामकाजात, ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या आणि देवस्वोम समस्यांमध्ये त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. शिवाय, कोविडच्या प्रसाराच्या संदर्भात निवडणूक आयोगावर करण्यात आलेल्या टीकेचीही मोठी चर्चा होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT