Jungle Safari Video: प्राणीसंग्रहालयात पिंजऱ्यात बंद असलेल्या प्राण्यांना पाहणे एक सामान्य गोष्ट आहे, पण जंगली प्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात जवळून पाहण्याचा अनुभव वेगळाच असतो. याच रोमांचक अनुभवासाठी अनेकजण जंगल सफारीला जातात. मात्र, जंगली प्राण्यांवर कधीही विश्वास ठेवता येत नाही, ते कधीही हल्ला करु शकतात. अशाच एका थरारक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्याने पाहणाऱ्यांचेही श्वास थांबले.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक सफारी गाडी जंगलाच्या रस्त्याने जात असताना अचानक एक चिडलेला गेंडा त्यांच्या दिशेने धावत येतो. हा गेंडा गाडीवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे दिसताच, गाडीचा चालक जराही वेळ न घालवता तात्काळ गाडी रिव्हर्स गिअरमध्ये घेऊन वेगाने पळू लागतो. या व्हिडिओमधील सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे ड्रायव्हरचे कौशल्य. जंगलाच्या अरुंद रस्त्यावर मागे न बघता वेगाने रिव्हर्समध्ये गाडी चालवणे खूप कठीण असते, पण या ड्रायव्हरने कमालीची प्रतिभा दाखवली. तो योग्य मार्गावर आणि पूर्ण वेगात गाडी चालवत राहिला, ज्यामुळे त्यांचा गेंड्यापासून पाठलाग सुटला आणि सर्वांचे प्राण वाचले. हा प्रसंग पाहून सोशल मीडियावर (Social Media) अनेकांनी ड्रायव्हरच्या धैर्याची आणि कौशल्याची प्रशंसा केली आहे.
दरम्यान, हा 32 सेकंदांचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' वर @Am_Blujay नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. अवघ्या काही तासांतच या व्हिडिओला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत 40 लाखांपेक्षा जास्त वेळा हा व्हिडिओ पाहिला गेला आहे, तर 30 हजारांहून अधिक लोकांनी तो लाईक केला आहे.
व्हिडिओ पाहिल्यानंतर युजर्संनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले की, "अशा प्रकारे रिव्हर्स गिअरमध्ये गाडी चालवण्यासाठी कठोर प्रशिक्षण घ्यावे लागते," तर दुसऱ्याने म्हटले की, "मी तर इतकी घाबरले असते की गाडीच चालवू शकले नसते." आणखी एका युजरने "हा तर ज्युरासिक पार्कसारखा सीन आहे," असे म्हणत या प्रसंगाचे वर्णन केले आहे. ही घटना जंगली प्राण्यांच्या वर्तनाची अनिश्चितता पुन्हा एकदा सिद्ध करते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.