ED  Dainik Gomantak
देश

झारखंड मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तींऱ्यावर ईडीचे छापे

पंकज मिश्रा आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी चौकशी सुरु

दैनिक गोमन्तक

देशात ईडीच्या छापेमारीवरुन केंद्र सरकारवर आरोप होत आहेत. केंद्रीय संस्थांचा वापर करत भाजप विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा म्हटलं जात आहे. राष्ट्रीय काँग्रेसने ही यावर बऱ्याचदा आवाज उठवला आहे.( jharkhand leader Pankaj Mishra ED conducts raid about money laundering )

असे असताना मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निकटवर्तींऱ्यावर ईडीचे छापे पडले आहेत. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे राजकीय प्रतिनिधी पंकज मिश्रा आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगच्या चौकशीचा एक भाग म्हणून ईडीने आज ( शुक्रवारी )झारखंडमध्ये सुमारे 18 ठिकाणी छापे टाकले.

मिळालेल्या माहितीनुसार चौकशीचा एक भाग म्हणून कज मिश्रा यांच्या साहिबगंज जिल्हा आणि त्याच्या लगतच्या बरहैत आणि राजमहल या भागात चौकशी केली जात आहे. विशेष म्हणजे हा तपास राज्यातील टोल प्लाझा निविदा वाटपातील कथित अनियमिततेशी संबंधित आहे. तपास एजन्सीच्या दिलेल्या माहितीनुसार, सुमारे 18 ठिकाणे शोधली जात आहेत आणि मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या फौजदारी कलमांतर्गत कारवाई केली जात आहे.

राज्य पोलिसांच्या एफआयआरमुळे मनी लाँड्रिंग प्रकरण समोर आले आहे, आणि झारखंडमधील कथित बेकायदेशीर कोळसा खाण आणि टोल प्लाझा निविदांच्या ऑपरेशनमध्ये गुंतलेल्या लोकांमधील कथित संबंधांचाही ईडी शोध घेत आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पूजा सिंघल या 2000 च्या बॅचच्या अधिकारी असून त्या झारखंड खाण सचिवपदाचा कार्यभार सांभाळत होत्या.

ईडीने अटक केल्यानंतर राज्य सरकारने त्यांना निलंबित केले होते. एजन्सीने या आठवड्याच्या सुरुवातीला रांची येथील विशेष पीएमएलए न्यायालयात त्याच्या आणि इतरांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. यानंतर आता या प्रकरणावर चौकशी सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Online Betting Raid: गोवा पोलिसांचा डबल धमाका! ऑनलाइन सट्टेबाजी आणि दलालांवर एकाच वेळी कारवाईचा बडगा

Dewald Brevis: 22 वर्षीय बेबी एबीचं वादळ, ऑस्ट्रेलियाला धुतलं, विराट कोहली- बाबर आझमचा विक्रम उद्ध्वस्त

Goa Tourism: 'अन्यथा पर्यटन सेवा बंद करू!' म्हादईवरील रिव्हर राफ्टींग निधीसाठी पंचायत आक्रमक

Cristiano Ronaldo In Goa: गोव्यात 'ख्रिस्तियानो रोनाल्डो'ला पाहण्याचे स्वप्न अधांतरी; खेळण्याबाबत अनिश्चितता कायम

Rahul Gandhi: "चोरी चोरी, चुपके चुपके..." राहुल गांधींनी केला 'वोट चोरीचा' व्हिडिओ; निवडणूक आयोगावर साधला निशाणा

SCROLL FOR NEXT