Jharkhand ATS Arrested 2 ISIS People Dainik Gomantak
देश

झारखंड एटीएसने ISIS च्या दोन दहशतवाद्यांना पकडले, एकाला जायचे होते पॅलेस्टाईनला!

Jharkhand ATS Arrested 2 ISIS Terrorists: झारखंडच्या दहशतवादविरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे.

Manish Jadhav

Jharkhand ATS Arrested 2 ISIS Terrorists: झारखंडच्या दहशतवादविरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. झारखंड एटीएसने बुधवारी राज्यातील गोड्डा आणि हजारीबाग जिल्ह्यातून दोन कथित ISIS च्या दहशतवाद्यांना अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, एटीएसला माहिती मिळाली होती की, रहमत नगर, गोड्डा येथील रहिवासी हसनैन नावाचा व्यक्ती इतर लोकांना कट्टरपंथी बनवण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून ISIS ची विचारधारा पसरवत आहे.

यानंतर एटीएसने त्याला पकडून चौकशी केली. चौकशीदरम्यान, आरिज हसनैनने मोहम्मद नसीम नावाच्या दुसऱ्या साथीदाराविषयी सांगितले.

ISIS चा प्रचार करत होता

झारखंड (Jharkhand) एटीएसने सांगितले की, झारखंड एटीएसला गोड्डा येथील आसनबनी पोलीस स्टेशन अंतर्गत रहमत नगर येथील रहिवासी आरिज हसनैन हा सोशल मीडियाद्वारे ISIS ची विचारसरणी पसरवत असून निरपराध लोकांना कट्टरतावादी बनवत असल्याची माहिती मिळाली होती.

माहितीच्या आधारे कारवाई करत एटीएसने त्याची चौकशी केली असता तो इसिसशी संबंधित असल्याचे निष्पन्न झाले. चौकशीदरम्यान त्याने मोहम्मद नसीम नावाचा आणखी एक व्यक्ती इसिसशी संबंधित असल्याचेही उघड केले.

त्याआधारे मोहम्मद नसीमलाही अटक करण्यात आली. त्याचवेळी एटीएसला तपासादरम्यान आरिजच्या मोबाईलवर टेलिग्रामच्या माध्यमातून केलेले संशयास्पद चॅट्सही आढळून आले आहेत.

पाकिस्तानच्या दहशतवाद्यांशी संपर्क

नसीमने 'जिहाद' आणि 'कुफ्रा विथ टॅगूट' नावाची दोन पुस्तके आरिजला पाठवली होती, असे एटीएसने पुढे सांगितले. दोन्ही पुस्तके जिहाद आणि ISIS च्या विचारसरणीने प्रेरित आहेत. नसीमने त्याला ISIS चा 'बेथ' पाठवला होता. तो पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात होता.

त्याचवेळी, आरिजने चौकशीदरम्यान सांगितले की, त्याला पॅलेस्टाईनमध्ये जाऊन गाझाला इस्रायलपासून (Israel) मुक्त करण्यासाठी मस्जिद अल-अक्सावर आत्मघाती हल्ला करायचा होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ajinkya Rahane Retirement: अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, भावनिक VIDEO शेअर करत म्हणाला, "मी माझ्या फलंदाजीमध्ये..."

Mapusa Traffic Police: म्हापशाच्या रस्त्यांवरील ट्रॅफिक जॅमला बसणार ब्रेक! 'वाहतूक व्यवस्थेवर लक्ष ठेवा!' उपसभापतींच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक

Goa Cyber Fraud Cases: गोव्यात सायबर फसवणुकीचे वाढते जाळे; ऑनलाईन व्यवहारांत नागरिकांना लाखो रुपयांचा गंडा, पोलिसांचा सतर्कतेचा इशारा

Bharatiya Nyaya Sanhita Cases: सुमारे 78% प्रकरणांत आरोपपत्रे दाखल; 'बीएनएस' अंतर्गत गेल्‍या दोन वर्षांत 4,459 गुन्‍ह्यांची नोंद

Goa Cooperative Societies: राज्यातील 42% सहकारी सोसायट्या बंद, 42% सोसायट्या तोट्यात; सहकार क्षेत्राच्या आर्थिक सक्षमतेवर केंद्रीय सहकारमंत्र्यांकडून प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT