Jharkhand Crime: ती सासरी पोहोचलीच नाही... एकटी महिला दिसताच जबरदस्तीने दारु पाजून केला सामूहिक बलात्कार

Crime News: महिलेला शुद्धीवर आल्यानंतर तिने गावकऱ्यांकडे मदत मागितली. गावकऱ्यांनी महिलेला कपडे दिले आणि घरी नेले.
Jharkhand Crime
Jharkhand CrimeDainik Gomanmtak
Published on
Updated on

Jharkhand Crime: झारखंडच्या गढवा जिल्ह्यातील नगर उंटारी पोलीस स्टेशन परिसरात दुचाकीवरुन आलेल्या दोन हल्लेखोरांनी एका विवाहित महिलेला तिच्या सासरच्या घरातून जबरदस्तीने नेले, त्यानंतर त्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

हा प्रकार एवढा गंभीर होता की, महिलेला तशाच अवस्थेत सोडून दोघेही घटनास्थळावरुन पळून गेले. शुद्ध आल्यानंतर तिने गावकऱ्यांकडे मदत मागितली. गावकऱ्यांनी महिलेला कपडे दिले आणि घरी नेले.

दरम्यान, या संपूर्ण प्रकाराबाबत महिलेने नगर ओंत्री पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारीत महिलेने म्हटले आहे की, सोमवारी रात्री ती आपल्या माहेरीन सासरच्या घरी परतत होती. वाटेत कोणतेही वाहन न मिळाल्याने ती पायी गावाकडे परतत होती.

दरम्यान, लिफ्ट देण्याच्या बहाण्याने दोन दुचाकीस्वार तरुणांनी महिलेचा विनयभंग केला, महिलेने विरोध केला असता, दोन्ही तरुणांनी तिला पाणी देण्याच्या बहाण्याने जबरदस्ती दारु पाजली.

महिला बेशुद्ध पडल्यानंतर दोन्ही आरोपी (Accused) तिला स्मशानभूमीत घेऊन गेले. जिथे तिच्यावर त्यांनी सामूहिक बलात्कार केला.

Jharkhand Crime
Jharkhand Crime: क्रौर्याची परिसीमा! आधी हत्या केली नंतर डोळे अन् किडनी काढली; झारखंडमध्ये घटनेनंतर तणाव

पोलिस घटनास्थळी पोहोचले

स्थानिक लोकांच्या मदतीने महिलेने नगर उंटारी पोलीस ठाणे गाठले, जिथे तिने सामूहिक बलात्काराच्या घटनेबाबत दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. दोन्ही आरोपींना पकडण्यासाठी अनेक ठिकाणी छापेमारी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Jharkhand Crime
Jharkhand Crime: धक्कादायक! चार मुलांच्या आईचे अपहरण करुन सामूहिक बलात्कार, नराधमांनी...

आरोपींना लगाम नाही

झारखंडमध्ये गेल्या काही दिवसांत विवाहित महिलेसोबत सामूहिक बलात्काराची ही पहिलीच घटना नाही, याआधी देवघर जिल्ह्यातील मधुपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन मुलांची आई आपल्या नातेवाईकाच्या घरातून परतत असताना, यावेळी चार हल्लेखोरांनी तिच्यावर शस्त्रांनी हल्ला केला. महिलेचे त्यांनी अपहरण केले.

निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पीडितेने पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे त्वरीत कारवाई करत पोलिसांनी (Police) या घटनेत सहभागी असलेल्या श्यामसुंदर दास, देवदत्त महार आणि अजित दास या चारपैकी तीन आरोपींना अटक केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com