Uttar Pradesh Crime Dainik Gomantak
देश

Crime News: लिव्ह-इन पार्टनरची हत्या करून मृतदेह पेटीत जाळला, राख नदीत फेकली; हत्येच्या 8 दिवसांनंतर सत्य आलं समोर

Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशातील झांसी शहरात एका निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याने आपल्या लिव्ह-इन पार्टनरची अत्यंत क्रूरपणे हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

Sameer Amunekar

झांसी: उत्तर प्रदेशातील झांसी शहरात एका निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याने आपल्या लिव्ह-इन पार्टनरची अत्यंत क्रूरपणे हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. आरोपीने केवळ हत्याच केली नाही, तर पुरावे नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह लोखंडी पेटीत कोंडून जाळला आणि तिची राख नदीत फेकून दिली. मात्र, एका ड्रायव्हरच्या प्रसंगावधानामुळे हा काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार उघडकीस आला आहे.

आरोपी राम सिंह परिहार याने दोन लग्ने केली होती, तरीही तो ३५ वर्षीय प्रीती नावाच्या महिलेसोबत लिव्ह-इनमध्ये राहत होता. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, प्रीती त्याच्याकडे वारंवार मोठ्या रकमेची मागणी करत होती. यापूर्वीही तिने लाखो रुपये घेतल्याचे सांगितले जाते. याच आर्थिक त्रासाला कंटाळून राम सिंहने तिचा काटा काढण्याचे ठरवले. त्याने ८ जानेवारीच्या सुमारास तिची हत्या केली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे.

मृतदेह जाळण्यासाठी रचला कट

हत्येनंतर पुरावे मिटवण्यासाठी आरोपीने घराच्या अंगणात वाळलेली लाकडे गोळा करण्यास सुरुवात केली होती. त्याने एका निळ्या रंगाच्या लोखंडी पेटीत मृतदेह ठेवला आणि त्याला आग लावली. शेजाऱ्यांना जळण्याचा वास आला, मात्र थंडीपासून वाचण्यासाठी तो शेकोटी पेटवत असावा, असे त्यांना वाटले. शरीराची पूर्ण राख झाल्यानंतर त्याने ती राख नदीत विसर्जित केली. मात्र, ती पेटी जेव्हा तो आपल्या दुसऱ्या पत्नीच्या घरी पाठवू लागला, तेव्हा त्याचे बिंग फुटले.

ड्रायव्हरच्या सतर्कतेने लागला छडा

राम सिंहने आपल्या दुसऱ्या पत्नीच्या मुलाला, नितीनला फोन करून ती पेटी घरी आणण्यास सांगितले. पेटी नेण्यासाठी 'जयसिंह पाल' नावाचा लोडर ड्रायव्हर बोलावण्यात आला. पेटी उचलताना ड्रायव्हरला त्यातून येणारा वास आणि वजनाबाबत संशय आला.

त्याने तत्काळ पोलीस कंट्रोल रूमला फोन केला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पेटी उघडली असता, त्यात मानवी हाडे, कोळसा आणि जळालेल्या अवशेषांचे तुकडे आढळले, ज्यामुळे सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली.

आरोपीचा मुलगा ताब्यात; मुख्य आरोपी फरार

याप्रकरणी एसपी सिटी प्रीती सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, फॉरेन्सिक टीमने सर्व पुरावे गोळा केले आहेत. पीडितेच्या पहिल्या पतीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीचा मुलगा नितीन आणि आणखी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. मुख्य आरोपी राम सिंह परिहार सध्या फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim Mining Protest: पैरातील लोकांचा खाणीविरोधात पुन्हा एल्गार! साळगावकर खाणीचे कामकाज पाडले बंद; प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामस्थ आक्रमक

Pakistani Actress Video: "भारतीय पुरुष पाकिस्तानी मुलींसाठी वेडे...", पाक अभिनेत्रीच्या दाव्याने सोशल मीडियावर वाद, व्हिडिओ VIRAL

Viral Post: "आता तरी गंभीर व्हा!" विजयाचा पत्ता नाही अन् पराभवांचे रेकॉर्ड्स; नेटकऱ्यांनी गौतम गंभीरला धरलं धारेवर

Goa Crime: मांद्रेत धक्कादायक प्रकार, 6 जणांच्या टोळक्याकडून वृद्ध पती-पत्नीसह मुलाला मारहाण; प्रॉपर्टीच्या वादातून राडा!

Benaulim Beach: एव्हरी डे इज ए गुड डे! फिशरमन पेलेचा बम्पर कॅच; विद्यार्थ्यांनीही घेतले मासेमारीचे धडे Watch Video

SCROLL FOR NEXT