Russian Killer Goa: 'तो' रशियन किलर राहिला होता गुहेत! अनेक राज्यात होते वास्तव्य; नेमके किती खून केले याचा तपास सुरु

Russian Tourist Murder Goa: रशियन सीरियल किलर आलेक्सेई लिओनोव याच्‍या कारनाम्‍यांमुळे गोव्‍यातच नव्‍हे तर संपूर्ण जगभरात खळबळ माजली आहे. तो वारंवार आपली जबानी बदलत आहे.
Russian tourist murder Goa
Russian tourist murder GoaDainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी: रशियन सीरियल किलर आलेक्सेई लिओनोव याच्‍या कारनाम्‍यांमुळे गोव्‍यातच नव्‍हे तर संपूर्ण जगभरात खळबळ माजली आहे. तो वारंवार आपली जबानी बदलत आहे. पोलिसही तोंड उघडायला तयार नाहीत. त्‍यामुळे या प्रकरणाचे गूढ आणखी वाढले आहे.

आलेक्सेई लिओनोव याने आत्तापर्यंत दोन खुनांची कबुली दिली असली तरी ही संख्‍या वाढण्‍याची शक्‍यता आहे. संशयित याआधी आसाम, हिमाचल प्रदेश आणि कर्नाटक येथे वास्तव्यास होता. अलीकडेच तो गोकर्ण येथे गुहेत वास्तव्य करून होता अशीही माहिती पुढे आली आहे. त्या दृष्टीने तपास सुरू आहे.

मोरजी व हरमल येथे घडलेल्या दोन रशियन महिलांच्‍या खुनांनी संपूर्ण गोवा हादरून गेला आहे. रशियन पर्यटक असलेल्या आलेक्सेई लिओनोव याने गळा चिरून त्‍यांचा खून केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.

पैशांच्या लालसेपोटी आणि प्रेमसंबंधातील संशयातून त्‍याने हे कृत्‍य केल्‍याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या प्रकरणामुळे केवळ पोलिसांचीच नव्हे तर पर्यटन व्यावसायिकांचीही झोप उडाली आहे. मोरजी, हरमल परिसरात वास्तव्यास असलेले पर्यटक भयभीत झाले असून, रशियन पर्यटकांना घरे भाड्याने देणाऱ्या घरमालकांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे. या दुहेरी हत्याकांडांवरून सध्या पेडणे तालुक्यात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत.

बामणभाटी-हरमल येथे एका भाड्याच्या खोलीत दोन दिवसांपूर्वी आलेक्सेई लिओनोव याने एलिना (३७) या रशियन महिलेचा गळा चिरून खून केल्याची घटना उघडकीस आल्‍यानंतर घरमालक उत्तम नाईक यांनी मांद्रे पोलिसांत तक्रार दाखल केली.

त्याच दिवशी मोरजी येथील मधलावाडा परिसरात एलिना वानीवा (३७) या रशियन महिलेचा बाथरूममध्ये नग्न अवस्थेत मृतदेह आढळून आला. तिचाही गळा चिरून खून झाल्याचे स्‍पष्‍ट झाले.

या दोन्ही घटनांनंतर मांद्रे पोलिसांनी संशयित आलेक्सेई लिओनोव याला तातडीने अटक केली. मात्र चौकशीदरम्यान तो वारंवार आपली जबानी बदलत असल्याने पोलिसांचा संशय अधिकच बळावला आहे. त्याने नेमके किती खून केले आहेत, याचा तपास सध्या सुरू आहे.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, संशयित सुरुवातीला रशियन महिलांशी प्रेमसंबंध प्रस्थापित करत असे. प्रेमाने विश्‍‍वास संपादन केल्यानंतर, त्या महिलांचे हात मागून बांधून त्‍यांच्‍यावर शारीरिक अत्याचार करत असे. आणि अखेरीस खून करण्यापर्यंत त्याची मजल जात असे.

त्याचबरोबर तो पीडित महिलांकडून मोठ्या प्रमाणात पैसेही उकळत असे. पैसे न दिल्यास त्‍या महिलांचा मानसिक छळ करत असल्‍याची माहितीही तपासात पुढे आली आहे. मात्र संशयित वारंवार जबानी बदल असल्‍यामुळे पोलिस तपासात मोठी अडचण निर्माण झाली आहे.

अनुत्तरित प्रश्‍‍न

  संशयिताकडे वैध व्हिसा होता का?

गोव्‍यात त्‍याचे कधीपासून वास्‍तव्‍य?

स्वत:ची उपजीविका

तो कसा करतो?

तो खरोखरच मनोरुग्‍ण आहे का?

त्याचा गुन्हेगारी इतिहास आहे का?

पीडित महिलांची पार्श्वभूमी तपासली आहे का?

 तो ड्रग्ज ॲडिक्ट होता का?

खून फक्त दोनच की आणखीही?

Russian tourist murder Goa
'त्या' रशियन पर्यटकाने केले 15 खून? सीरियल किलरने उडविली गोवा पोलिसांची झोप; संशयिताला 14 दिवसांची पोलिस कोठडी

...तर पोलिसांची फजिती

पोलिसांनी अनैसर्गिक मृत्‍यू म्‍हणून जी प्रकरणे नोंद केली आहेत, ते खून आपणच केले, असा दावा आलेक्सेई करत आहे. त्यामुळे पोलिसांवर दबाव वाढला आहे. खरेच इतके खून झाले असतील तर त्यांची वाच्यता का झाली नाही, असा प्रश्‍न उपस्थित होईल.

Russian tourist murder Goa
Russian Woman Murder: 1 नाही, 2 रशियन महिलांचा खून! नाव-वय सारखे असल्याने वाढला गोंधळ; संशयित आरोपीच्या कबुलीने गोव्यात खळबळ

पर्यटनावर परिणाम

  रशियन पर्यटक भयभीत

  घरमालकांमध्ये दहशत

  मोरजी, हरमल येथील लोक प्रचंड तणावाखाली

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com