Jawaharlal Nehru University  Dainik Gomantak
देश

BBC Documentary: पीएम मोदी अन् गुजरात दंगलीवरील BBC डॉक्युमेंट्रीवरुन JNU मध्ये कल्ला, वीजपुरवठा खंडित!

Jawaharlal Nehru University: जवाहरलाल नेहरु विद्यापीठ परिसर पूर्णपणे अंधारमय झाला आहे. पीएम मोदींवरील बीबीसी डॉक्युमेंट्रीचे स्क्रीनिंग थांबवण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने संपूर्ण कॅम्पसचे दिवे बंद केले आहेत.

दैनिक गोमन्तक

Jawaharlal Nehru University: जवाहरलाल नेहरु विद्यापीठ परिसर पूर्णपणे अंधारमय झाला आहे. पीएम मोदींवरील बीबीसी डॉक्युमेंट्रीचे स्क्रीनिंग थांबवण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने संपूर्ण कॅम्पसचे दिवे बंद केले आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये दगडफेकीच्या घटनाही घडल्या आहेत. या माहितीपटाच्या प्रदर्शनावर विद्यापीठ प्रशासनाने यापूर्वीच बंदी घातली आहे.

दरम्यान, या माहितीपटाचे प्रदर्शन थांबवण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने कॅम्पसची वीज खंडित केल्याचे बोलले जात आहे. बंदी असतानाही आज रात्री या माहितीपटाच्या प्रदर्शनाचे नियोजन विद्यार्थी (Students) संघटनांनी केले होते. वीज खंडित झाल्यानंतर जेएनयू कॅम्पसमध्ये मोबाईलवर हा डॉक्युमेंट्री पाहण्यासाठी जमलेले विद्यार्थी.

खरे तर, या संदर्भात, बीबीसीच्या वादग्रस्त माहितीपटाच्या प्रसारणाची घोषणा करणारे पोस्टर विद्यार्थी संघटनेने जारी केले होते. त्याचबरोबर हा कार्यक्रम रद्द करा अन्यथा कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांना सांगितले होते. सरकारने शुक्रवारी सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्म ट्विटर आणि यूट्यूबला 'इंडिया: द मोदी क्वेश्चन' शीर्षकाच्या माहितीपटाच्या लिंक ब्लॉक करण्याचे निर्देश दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arijit Singh Retirement: मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का, अरिजीत सिंगचा प्लेबॅक सिंगिंगला रामराम; पोस्ट करत म्हणाला, "मी आतापासून..."

Harry Brook: 11 चौकार, 9 षटकार... हॅरी ब्रुकनं 29 चेंडूत कुटल्या 90 धावा; श्रीलंकेच्या गोलंदाजांना धुतलं Watch Video

Goa to Nepal on Electric Bike: गोव्याच्या पोरांची कमाल! 'इलेक्ट्रिक बाईक'वरून गाठलं थेट 'नेपाळ'; 3,300 किमीचा थरार

UGC New Rules: "जातीवरुन कोणाशीही भेदभाव होणार नाही!", युजीसीच्या नवीन 'समानता' नियमावलीवर शिक्षण मंत्र्यांनी स्पष्टचं सांगितलं VIDEO

KL Rahul Retirement: ''मनात संन्यास घेण्याचा विचार..." केएल राहुल क्रिकेटला ठोकणार 'रामराम'? सोशल मीडियावर चर्चांना उधाण VIDEO

SCROLL FOR NEXT