Jawad cyclone in Odisha and West Bengal IMD issue alert in states Dainik Gomantak
देश

जवाद आज किनारपट्टीला धडकणार; ओडिशा, पश्चिम बंगालला रेड अलर्ट

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, रविवारी ओडिशाच्या पुरी किनारपट्टीवर 90-100 किमी प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात

दैनिक गोमन्तक

जवाद चक्रीवादळ (Jawad cyclone) ओडिशात (Odisha) पोहोचण्यापूर्वीच राज्यात सकाळी अनेक ठिकाणी जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, हे वादळ आज दुपारपर्यंत पुरी किनारपट्टीवर धडकण्याची आणि त्याचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे. ओडिशाच्या गंजम, पुरी, खुर्दा, जगतसिंगपूर, केंद्रपारा आणि कटक जिल्ह्याच्या काही भागात पुढील काही तासांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने सांगितले की, जवाद वादळाची तीव्रता शनिवारी कमकुवत होऊन खोल दबावात बदलले.(Jawad cyclone in Odisha and West Bengal IMD issue alert in states)

रविवारी दुपारी वादळ कमकुवत होण्याआधी आणि पुरी किनारपट्टीवर पडण्याची शक्यता लक्षात घेऊन NDRF दलाच्या 18 तुकड्या पश्चिम बंगालमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, गरज पडल्यास ते लोकांना बाहेर काढण्यास तयार आहेत. IMD ने जारी केलेल्या बुलेटिननुसार, खोल दाब क्षेत्र आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमपासून 230 किमी पूर्व-ईशान्य, गोपालपूरपासून 130 किमी दक्षिण-नैऋत्य, पुरीच्या 180 किमी दक्षिण-दक्षिण, पारादीपच्या दक्षिण-दक्षिण 270 किमी अंतरावर आहे.

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, रविवारी ओडिशाच्या पुरी किनारपट्टीवर 90-100 किमी प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात. मुसळधार पावसामुळे किनारी जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत होऊ शकते. हे पाहता संबंधित जिल्ह्यातील स्थानिक प्रशासन पाणी साचण्याची शक्यता असलेल्या ठिकाणांहून लोकांना बाहेर काढण्याचे नियोजन करत आहे. विशेष मदत आयुक्त पीके जैना यांनी सांगितले की, कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी मदत पथकांना सतर्क करण्यात आले आहे.

आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यात शनिवारी 'जवाद' चक्रीवादळामुळे झालेल्या मुसळधार पावसामुळे बाधित लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यासाठी 60 मदत शिबिरे उभारण्यात आली आहेत. राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार, विझियानगरम आणि विशाखापट्टणममध्ये जोरदार पाऊस झाला नाही.मात्र, श्रीकाकुलम जिल्ह्यात 11 सेमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. त्याचवेळी वज्रपुकोथरू मंडळात जोरदार वाऱ्यामुळे नारळाचे झाड उन्मळून पडल्याने १६ वर्षीय नागरिकाचा मृत्यू झाला आहे .

याच चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मध्य रेल्वेने शनिवार आणि रविवारसाठी 60 हून अधिक गाड्या रद्द केल्या आहेत.

तर दुसरीकडे पश्चिम बंगाल सरकारने शनिवारी दक्षिण 24 परगणा आणि पूरबा मेदिनीपूर जिल्ह्यातील सुमारे 11,000 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले असून पर्यटकांना समुद्रकिनाऱ्यांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे . काकद्वीप, दिघा, शंकरपूर आणि इतर किनारी भागात मच्छीमारही बोटी घेऊन परतले आहेत. हवामान खात्याने कोलकाता, पूर्व आणि पश्चिम मेदिनीपूर, उत्तर आणि दक्षिण 24 परगणा, झारग्राम, हुगळी आणि हावडा जिल्ह्यात एक किंवा दोन ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Labour Report: गोव्यात रोजंदारीवरील कामगारांच्या संख्येत मोठी घट! 10 वर्षांत 40 हजार कामगार कमी झाले; कारखाने आणि बाष्पक खात्याच्या नोंदीतून उघड

New Labour Law: कामगारांना समान वेतन, डिजिटल पेमेंट! केंद्र सरकारच्या नव्या कायद्यांची गोव्यात अंमलबजावणी होणार; मुख्यमंत्री सावंतांची घोषणा

Goa ZP Election: युती झाली, पण जागावाटप थांबले! झेडपी निवडणुकीत 'काँग्रेस-फॉरवर्ड-आरजीपी' एकत्र; आरक्षणाच्या निवाड्याकडे तिन्ही पक्षांचे लक्ष

South Goa ZP Reservation: ओबीसी 'ट्रिपल टेस्ट' आणि एससी आरक्षणाचा पेच! झेडपी निवडणुकीच्या भवितव्याचा निर्णय आता न्यायालयाच्या हाती

Mhadei Sanctuary Issue: सीमा ठरवणार, वस्ती हलवणार? म्हादई अभयारण्यात वस्तीला परवानगी नाही, व्याघ्र प्रकल्पाचा पर्याय हुकल्याने गोंधळ; क्लॉड आल्वारिस यांनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT