jasprit bumrah and mohammad kaif Dainik Gomantak
देश

Jasprit Bumrah: आधीही चुकीचा होतास आत्ताही! रोहित-सूर्याच्या कप्तानीखाली गोलंदाजीची तुलना करणाऱ्या कैफला बुमराहने दिलं सडेतोड उत्तर

Jasprit Bumrah Reply To Mohammad Kaif: भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ यांच्यात सोशल मीडियावर जोरदार शाब्दिक चकमक झाली.

Manish Jadhav

Jasprit Bumrah Reply To Mohammad Kaif: भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ यांच्यात सोशल मीडियावर जोरदार शाब्दिक चकमक रंगली. आशिया कप 2025 दरम्यान बुमराहच्या गोलंदाजीच्या भूमिकेबाबत कैफने 'एक्स' वर एक पोस्ट केली, ज्यावर आता बुमराहने सडेतोड उत्तर दिले.

कैफने काय म्हटले?

कैफने आपल्या पोस्टमध्ये बुमराहच्या गोलंदाजीच्या भूमिकेबद्दल चिंता व्यक्त केली होती. त्याने म्हटले होते की, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली बुमराह सहसा 1, 13, 17, 19व्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असे. पण, आशिया कपमध्ये सूर्यकुमार यादव आणि गौतम गंभीर यांच्या नेतृत्वाखाली त्याने सुरुवातीलाच तीन ओव्हर्स टाकल्या.

कैफने असा अंदाज व्यक्त केला की, दुखापतीपासून वाचण्यासाठी बुमराह सध्या शरीर गरम झाल्यावरच गोलंदाजी करणे पसंत करतो. विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेत मजबूत संघांविरुद्ध उर्वरित 14 ओव्हर्समध्ये बुमराहची एक ओव्हर फलंदाजांसाठी मोठा दिलासा ठरु शकते, ज्यामुळे टीम इंडियाला (Team India) फटका बसू शकतो,' असे कैफने म्हटले.

बुमराहचे सडेतोड उत्तर

कैफच्या या पोस्टवर आता बुमराहने थेट उत्तर दिले. कैफच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना बुमराहने लिहिले, “आधीही तू चुकीचा होता आणि आजही तू चुकीचा आहेस.” बुमराहने असे उत्तर का दिले, हे त्याच्या मागील एका घटनेमुळे स्पष्ट होते. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यानही कैफने बुमराहबद्दल एक पोस्ट केली होती, ज्यात त्याने म्हटले होते की, बुमराहचे शरीर साथ देत नाही, त्यामुळे तो लवकरच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेईल. कदाचित याच कारणामुळे बुमराहने 'आधीही तू चुकीचा होतास' असे म्हटले असावे.

आशिया कपमधील बुमराहची कामगिरी

त्याचवेळी, या आशिया कपमध्ये आतापर्यंत बुमराहची कामगिरी फारशी चांगली राहिलेली नाही. विशेषतः पाकिस्तानविरुद्धच्या (Pakistan) सुपर-4 सामन्यात त्याने 11.20 च्या इकॉनॉमी रेटने एकही विकेट न घेता 45 धावा दिल्या. संपूर्ण स्पर्धेत त्याने 5 बळी घेतले असून तो सर्वाधिक बळी घेणाऱ्यांच्या यादीत 12 व्या स्थानी आहे. दुसरीकडे, त्याचा सहकारी आणि चायनामन कुलदीप यादव 12 विकेट घेऊन या यादीत अव्वल स्थानी आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात मात्र बुमराहने चांगली गोलंदाजी केली. त्याने 18 धावा देत 2 बळी घेतले. तत्पूर्वी, नुकत्याच जाहीर झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठीही त्याची निवड झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

धक्कादायक! शेवपुरी खाणं बेतलं जीवावर, दोडामार्गच्या 35 वर्षीय तरुणाचा गोव्यात मृत्यू

Child Health Tips: पालकांनो, दुर्लक्ष नका करु! मुलांच्या आरोग्यासाठी वर्षातून एकदा हिमोग्लोबिन तपासणी का करावी? योग्य पातळी किती असावी? जाणून घ्या

Ravichandran Ashwin BBL: रविचंद्रन अश्विन 'बिग बॅश लीग'मध्ये खेळणार, 'या' संघाकडून मैदानात उतरणार; 'अशी' कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय

Salman Khan: बॉलिवूडचा सल्लूभाई म्हणतो, 'एक दिवस मलाही मुलं होतील'

Viral Video: लव्ह, फन आणि ताकद! नवऱ्यांना उचलून बायकांनी लावली आगळीवेगळी शर्यत, व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

SCROLL FOR NEXT