Jasprit Bumrah: जस्सीने रचला नवा इतिहास, अशी कामगिरी करणारा बनला पहिला आशियाई गोलंदाज

Manish Jadhav

भारत विरुद्ध इंग्लंड

भारतीय संघ इंग्लंडच्या भूमीवर 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. पहिला कसोटी सामना लीड्समधील हेडिंग्ले येथे खेळला जात आहे.

Jasprit Bumrah | Dainik Gomantak

जसप्रीत बुमराह

पहिल्या कसोटीत टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहचा जलवा पाहायला मिळाला. त्याने एकट्याने इंग्लंडच्या अर्ध्या संघाला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

Jasprit Bumrah | Dainik Gomantak

बुमराहचा पंच

बुमराहने 24.4 षटकांत 83 धावांत 5 बळी घेतले. या कामगिरीसह त्याने त्याच्या कसोटी कारकिर्दीत 14व्यांदा 5 बळी घेण्याचा रेकॉर्ड केला.

Jasprit Bumrah | Dainik Gomantak

तिसऱ्यांदा कामगिरी

बुमराहने इंग्लंडमध्ये कसोटी सामन्याच्या एका डावात 5 बळी घेण्याची महान कामगिरी तिसऱ्यांदा केली. यासह तो इंग्लंडच्या भूमीवर सर्वाधिक 5 बळी घेणारा भारतीय गोलंदाज बनला.

Jasprit Bumrah | Dainik Gomantak

9 भारतीय गोलंदाजांना मागे सोडले

बुमराहने ही महान कामगिरी करुन 9 भारतीय गोलंदाजांना मागे सोडले. बुमराहच्या आधी इंग्लंडमध्ये कसोटी सामन्याच्या एका डावात दोनदा 5 बळी घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये लाला अमरनाथ, बीएस चंद्रशेखर, कपिल देव, भुवनेश्वर कुमार, विनू मंकड, मोहम्मद निस्सार, चेतन शर्मा, इशांत शर्मा आणि सुरेंद्र नाथ यांचा समावेश आहे.

Jasprit Bumrah | Dainik Gomantak

150 बळी

तसेच, बुमराह हा SENA (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) देशांमध्ये 150 बळी घेणारा पहिला आशियाई गोलंदाज ठरला.

Jasprit Bumrah | Dainik Gomantak

केवळ 3 गोलंदाजांची कामगिरी

SENA देशांमध्ये केवळ 3 गोलंदाज 150 किंवा त्याहून अधिक बळी घेऊ शकले आहेत. यामध्ये वेस्ट इंडिजमधील 2 दिग्गज गोलंदाजांचा समावेश आहे.

Jasprit Bumrah | Dainik Gomantak

SENA देशांमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज

कर्टनी वॉल्श (वेस्ट इंडीज) - 213, कर्टली अ‍ॅम्ब्रोस (वेस्ट इंडीज): 184 जसप्रीत बुमराह (भारत): 150, मॅल्कम मार्शल (वेस्ट इंडीज): 148, वसीम अक्रम (पाकिस्तान): 146, अनिल कुंबळे (भारत): 141

Jasprit Bumrah | Dainik Gomantak

TVS Scooter: टीव्हीएसच्या 'या' स्टायलिश स्कूटरची ग्राहकांना भुरळ; गाठला नवा टप्पा

आणखी बघा