Jasprit Bumrah Dainik Gomantak
देश

Jasprit Bumrah: 50व्या कसोटीत बुमराहचा 'किलर' यॉर्कर! विंडीजचा फलंदाज हतबल, स्टंप्स आऊट ऑफ द पार्क Watch Video

IND vs WI 2nd Test: भारताने आपला पहिला डाव 518 धावांवर घोषित केला होता, ज्याच्या प्रत्युत्तरात वेस्ट इंडीजचा संघ मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला.

Manish Jadhav

Jasprit Bumrah Video: भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांनी तिसऱ्या दिवशी शानदार कामगिरी करत विंडीजचा पहिला डाव 248 धावांवर संपुष्टात आणला. या कामगिरीमुळे भारताला पहिल्या डावात 270 धावांची मोठी आणि महत्त्वपूर्ण आघाडी मिळाली. भारताने आपला पहिला डाव 518 धावांवर घोषित केला होता, ज्याच्या प्रत्युत्तरात वेस्ट इंडीजचा संघ मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला.

बुमराहच्या 'स्टंप उडवणाऱ्या' यॉर्करची चर्चा

तिसऱ्या दिवशी जेवणानंतर (Lunch Break) पहिली ओव्हर टाकण्यासाठी मैदानात उतरलेल्या जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) कमाल केली. आपल्या कारकिर्दीतील 50वा कसोटी सामना खेळत असलेल्या बुमराहने या ओव्हरमध्येच खैरी पियरेला (Khairy Pierre) तंबूचा रस्ता दाखवला. बुमराहने टाकलेला चेंडू इतका शानदार होता की, पियरे पूर्णपणे चितपट झाला. पियरेला तो चेंडू केवळ बचावात्मक खेळायचा होता, पण बुमराहचा तो 'जादुई' यॉर्कर (Yorker) थेट स्टंप्सवर आदळला. चेंडू लागताच स्टंप हवेत कलाबाजी करत दूरवर जाऊन पडली, जो बुमराहच्या भेदक गोलंदाजीची साक्ष देतो.

जसप्रीत बुमराहने 2018 मध्ये कसोटी पदार्पण केले होते आणि 50 सामन्यांत त्याने आतापर्यंत एकूण 223 विकेट्स मिळवल्या आहेत. त्याची यॉर्कर ही त्याची सर्वात मोठी ताकद मानली जाते.

कुलदीप यादवचे पाच बळी

वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या डावात भारतासाठी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला तो कुलदीप यादव (Kuldeep Yadav). कुलदीपने वेस्ट इंडीजच्या फलंदाजीचा कणा मोडत पाच विकेट्स मिळवले आणि आपल्या फिरकीची जादू दाखवली. कुलदीप यादवच्या भेदक गोलंदाजीमुळे वेस्ट इंडीजचा संघ मोठ्या धावसंख्येकडे जाऊ शकला नाही. कुलदीपशिवाय, रवींद्र जडेजाने तीन विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांना प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली.

वेस्ट इंडीजकडून एलिक एनाथाजे (Alick Athanaze) याने सर्वाधिक 41 धावा केल्या, पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. भारतीय गोलंदाजांच्या या सांघिक प्रदर्शनामुळे वेस्ट इंडीजचा डाव 248 धावांवर संपुष्टात आला आणि भारताला 270 धावांची मोठी आघाडी मिळाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourist Safety: 'पर्यटकांशी गैरवर्तन खपवून घेणार नाही'! पर्यटन खात्‍याचा इशारा; जबाबदारीचे भान ठेवण्‍याचे आवाहन

Goa Politics: 'अभियंत्याला पोलिसांनी नेले, वीज मंत्री काय करीत आहेत'? पाटकरांचा सवाल; अभ्यास करण्याचा ढवळीकरांना सल्ला

Goa Politics: खरी कुजबुज; घराबाहेर आले...पोलिस घेऊन गेले...!

Naru In Goa: गोमंतकीयांसाठी धोक्याची घंटा! गोव्यात आढळला खतरनाक 'नारू'; खांडेपार, कुर्टी येथे सापडला जंतू

Tragic Death: काळीज पिळवटले! खेळता खेळता पडला विहिरीत, मृत्यूशी दिली झुंज; 3 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

SCROLL FOR NEXT