jammu kashmir story crpf may not be required in kashmir in future says union home minister amit shah Dainik Gomantak
देश

जम्मू-काश्मीरमध्ये CRPF ची गरज भासणार नाही, अमित शहांचं मोठं वक्तव्य

दैनिक गोमन्तक

जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावरून दिवसेंदिवस मोठ्या घडामोडी घडत आहेत. काश्मीर फाइल्स हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर खोऱ्यातील चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांच्या तैनातीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. गृहमंत्री शाह यांनी शनिवारी सीआरपीएफच्या 83 व्या स्थापना दिनानिमित्त जम्मूमध्ये एका कार्यक्रमात भाग घेतला. यादरम्यान ते म्हणाले की, येत्या काही वर्षांत जम्मू-काश्मीरमध्ये सीआरपीएफची गरज भासणार नाही.

गृहमंत्री शाह यांनी जम्मू-काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या भूमिकेचे कौतुक केले. ते म्हणाले की, सीआरपीएफने केवळ खोऱ्यातील दहशतवादाशी लढण्यात महत्त्वाची भूमिका बजावली नाही, तर कायदा आणि सुव्यवस्था मजबूत करण्याचे कामही केले आहे. सीआरपीएफने जम्मू-काश्मीर, ईशान्य आणि नक्षलग्रस्त भागात उत्कृष्ट काम केले आहे. मला खात्री आहे की येत्या काही वर्षात या तिन्ही भागात CRPF ची गरज भासणार नाही. याचे सर्व श्रेय सीआरपीएफला जाईल.

सीआरपीएफचे कौतुक करताना शाह म्हणाले की, गेल्या काही वर्षांत जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्थेत मोठी सुधारणा झाली आहे. CRPF जवानांना संबोधित करताना त्यांनी कलम 370 आणि 35A हटवण्याबाबत बोलले. याचा फायदा जम्मू-काश्मीरमधील सर्वसामान्य जनतेला झाला असल्याचे ते म्हणाले. राष्ट्रीय राजधानी दिल्लीच्या बाहेर जम्मू आणि काश्मीरमध्ये सीआरपीएफ स्थापना दिवस साजरा करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

सीआरपीएफ (CRPF) जवानांना संबोधित करताना अमित शाह म्हणाले की, मी सीआरपीएफ जवान आणि त्यांच्या कुटुंबियांना माझ्या शुभेच्छा देतो. सीआरपीएफच्या शहीद जवानांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. जम्मू या ऐतिहासिक शहरात सीआरपीएफ स्थापना दिन साजरा केला जात आहे. सर्वप्रथम मला माता वैष्णोदेवीला नमन करायचे आहे. अमित शाह (Amit Shah) म्हणाले की, जम्मू हे ते ठिकाण आहे जिथे पं. प्रेमनाथ डोगरा आणि डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी एक राष्ट्र, एक ध्वज, एक संविधानाची चळवळ सुरू केली.

डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांची स्वप्न आम्ही पूर्ण करू शकलो याचा आम्हाला आनंद आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात आणि दहशतवादाविरुद्धच्या लढाईत सीआरपीएफने महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असे अमित शाह म्हणाले. ते म्हणाले की, नक्षलग्रस्त भाग असोत किंवा काश्मीर (Kashmir) किंवा ईशान्येकडील पाकिस्तान (Pakistan) पुरस्कृत दहशतवाद्यांशी लढा असो, सीआरपीएफने देशाच्या रक्षणासाठी कोणतीही कसर सोडली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT